
गेल्या चार दिवसात कोरोना संसर्ग झालेले १९ व्यक्ती आढळून आले आहेत
उमरगा (जि.उस्मानाबाद ) : मागील चार दिवसांपासून गारठा वाढल्याचे दिसले आहे. अगोदरच कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने मनात घर करून ठेवलेले आहे त्यात गारठ्याने सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवत असल्याने लोकामध्ये आजाराचा संशय वाढतोय. दरम्यान गेल्या चार दिवसात कोरोना संसर्ग झालेले १९ व्यक्ती आढळून आले आहेत.
बुधवारी घेतलेल्या अँटीजन चाचणीत तलमोड (ता. उमरगा) येथील दोन वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना संसर्गाने नागरिकांचे जीवनमान बऱ्याच अंशी बदलुन टाकले आहे. गेल्या सात महिन्याच्या कालावधीत दोन हजारापेक्षा अधिक लोकांना कोरानाचा संसर्ग झाला, त्यातून ९७ टक्के लोक बरे झाले आहेत. मात्र त्यासाठी झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाने लोकांना भयभित करून टाकले होते.
पंकजा मुंडेंच्या ताब्यातील साखर कारखान्यात 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी
अनेकांना खाजगी रुग्णालयाच्या उपचार खर्चाचा भुर्दंड सोसावा लागला. ५५ लोकांचा मृत्यु झाला. दरम्यान गेल्या एक महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र होते मात्र प्रभावी लक्षणे नसलेल्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसेंनदिवस वाढत आहे, उमरगा शहर व तालुक्यातही गेल्या तीन -चार दिवसात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे.
२० डिसेंबरच्या स्वॅबच्या चाचणीत शहरातील महात्मा बसवेश्वर शाळा दोन, एस.टी. कॉलनी एक तर येळी येथील एक जण पॉझिटिव्ह आले. २१ डिसेंबरच्या अँटीजन चाचणीत उमरगा व गुंजोटीतील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला. खाजगी रुग्णालयातील चाचणीत दोघे पॉझिटिव्ह आले तर स्वॅबच्या तपासणीत एक जण पॉझिटिव्ह आला आहे.
औरंगाबादच्या सिडको चौकात भीषण अपघात; एक तरुण ठार, बसमधील दहा प्रवासी जखमी
२२ डिसेंबरच्या अन्टीजेनच्या चाचणीत सहा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात येळीचे दोघे तर उमरगा शहरातील जैन मंदिर परिसरातील चौघांचा समावेश आहे. स्वॅबच्या तपासणीत जैन मंदिरातील दोघे तर उस्तूरी (ता. निलंगा ) येथील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी अन्टीजेनच्या चाचणीत तलमोडच्या दोन वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. दरम्यान १९ जणांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सावधगिरी महत्वाची-
कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही. त्याच्यासोबतच राहुन सावधानगिरी बाळगत जीवन जगावे लागणार आहे. थंडी, गारठ्याने कोरोनाची भिती वाढविली आहे, गारठ्याने शिंका येतात याचा अर्थ कोरोनाची लक्षणे असा होऊ शकत नाही मात्र संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या शिंका, खोकल्याने धोका होऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. गर्दीच्या ठिकाणी मॉस्कचा वापर होत नसल्याने संसर्गाची भिती वाढली आहे.
(edited by- pramod sarawale)