Corona Update : जालन्यात ८५ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू , बळींची संख्या पोचली २० वर

महेश गायकवाड
Friday, 3 July 2020

गेल्या दोन आठवड्यापासून जालना शहरात रोज कोरोना बाधित रूग्ण आढळत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गुरूवारी साठ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी (ता. तीन) जालना शहरातील  ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा वीसावा बळी गेला आहे.

जालना : गेल्या दोन आठवड्यापासून जालना शहरात रोज कोरोना बाधित रूग्ण आढळत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गुरूवारी साठ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी (ता. तीन) जालना शहरातील  ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा वीसावा बळी गेला आहे. दरम्यान सकाळी पुन्हा तीस संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात सर्वाधिक रूग्ण हे जालना शहरातील आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

जालना शहरात झपाट्याने वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे जिल्हयातील एकुण बाधितांचा आकडा आता ६५० झाला आहे. त्यातील ३६८ रूग्ण बरे झाले असून सध्या २७३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासन  विविध उपाययोजनांना करत असली तरी बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शुक्रवारी सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये जालना शहरातील एसटी कॉलनी, गोपालपुरा, चंदनझिरा, शोला चौक, सुवर्णकार नगर, पाणीवेस व मसाननगरमधील प्रत्येकी एक, मुर्तीवेसमधील पाच, अग्रसेन नगर मधील दोन, कादराबाद येथील चार व्यक्तींचा समावेश आहे. भोकरदन शहरातील सात व  तालुक्यातील धावडा येथील एक, अंबड शहरातील दोन, जाफराबाद शहरातील एक व तालुक्यातील वालसा वडाळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

जालना शहरातील सुवर्णकार नगरमधील एका ८५ वर्षीय वृद्धाचा सकाळी मृत्यू झाला आहे. प्रयोग शाळेकडून या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सदर वृद्धाची प्रकृती बरी नसल्याने बुधवारी त्यांना  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update jalna city one more corona death