esakal | Covishield: उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेस प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination In Umarga

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोना रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता.

Covishield: उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेस प्रारंभ

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद)  :  येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा  प्रारंभ शनिवारी (ता.१६) सकाळी  इंडियन मेडिकल असोशिएशनचे सचिव डॉ. प्रशांत मोरे यांना पहिली लस टोचुन करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोना रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता. कालांतराने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली, ती दोन हजारापेक्षा अधिक झाली. अशा कठीण काळात शासकिय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांची देखरेख केली.

शासकीय आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून पुन्हा रुग्णसेवेत ही मंडळी कार्यरत राहिली. राज्य सरकारने कोविड लसीकरणाची मोहिम हाती घेतली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी सहाशे कोविड लस उपलब्ध झाले आहेत. नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. एस.एम.एस पाठविलेल्या शंभर जणांना शनिवारी लस टोचण्याचा प्रारंभ करण्यात आला.

दुपारपर्यंत २५ जणांना लस देण्यात आली. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, वैद्यकिय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांच्या उपस्थितीत डॉ. मोरे यांना कोविनची टस देण्यात आली. यावेळी उस्मानाबादचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोस्वामी, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पांचाळ, डॉ. प्रताप शिंदे, डॉ. वसंत बाबरे, नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. दूपक पोफळे, डॉ. उदय मोरे आदी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या आणखी ताज्या बातम्या वाचा


डोस घेताना आणि घेतल्यावर कसलाही त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. लसीमुळे आठ ते दहा टक्के लोकाना सौम्य दुष्परिणाम होतात. जसे ताप, सर्दी आणि इंजेक्शनच्या जागी दुखने होते. मात्र गंभीर दुष्परिणाम नाहीत. लसीमुळे ९० ते ९५ टक्के प्रतिकार शक्ति मिळते ०.५ एम.एल.चे दोन डोस तीस ते चाळीस दिवसाच्या अंतराने घ्यावे लागतात. ही लस सुरक्षित असुन सर्वांनी घ्यावी, अफ़वावर विश्वास ठेवू नये.
- डॉ. प्रशांत मोरे

संपादन - गणेश पिटेकर