esakal | Corona update : लातूर हादरले, एकाच दिवशी तब्बल २९ पॉझिटिव्ह, तर आणखी एक कोरोनाचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण २११ व्यक्तींचे स्वॅब आज तपासणीसाठी आले होते. त्यातील १७१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ९ जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर २ जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत.

Corona update : लातूर हादरले, एकाच दिवशी तब्बल २९ पॉझिटिव्ह, तर आणखी एक कोरोनाचा बळी

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी (ता. २७) आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
त्यामुळे लातूर पुन्हा एकदा हादरले आहे. कोरोनाबधितांचा हा वाढता आकडा खाली आणण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे एका व्यक्तीचा लातुरात मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ७० वर्षांची होती. या घटनेमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता १६ झाली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण २११ व्यक्तींचे स्वॅब आज तपासणीसाठी आले होते. त्यातील १७१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ९ जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर २ जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. २९ पैकी वैद्यकीय संस्थेत तपासणीसाठी आलेल्यांपैकी ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या या ९ व्यक्ती बनशेळकी रस्ता, भीम नगर, सुळ गल्ली, शिवनगर, साई नगर, झीगणप्पा गल्ली, क्वाईल नगर येथील आहेत. एक व्यक्ती गंगापूर येथील आहे तर दुसरी व्यक्ती मिरकल (ता. बस्वकल्याण, जि. बिदर) येथील आहे. स्त्री रुग्णालय (लातूर) येथून तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती शहरातील अंबाजोगाई रस्ता भागातील आहे. उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथील ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय, औसा येथील ९ आणि अहमदपूर येथील ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

दिवसभरात ७ जणांना डिस्चार्ज
वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ७ रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असल्यामुळे आज घरी सोडण्यात आले. त्यापैकी तीन रुग्ण शहरातील आणि चार रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी दोन रुग्णास मधुमेह हा आजार होता. एका रुग्णास उच्च रक्तदाब हा आजार होता. एका रुग्णाचे हृदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यातील पाच रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार होता व हे पाच रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल होते. उर्वरित दोन रुग्णांना सौम्य स्वरूपाचा आजार होता. हे रुग्ण २५ ते ८० वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये चार पुरुष व तीन महिला रुग्ण यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर, डॉ. किरण डावळे यांनी दिली.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   


७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे लातुर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याआधी कोरोनामुळे उदगीरमधील रुग्णालयात ५५ वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी (ता. २५) मृत्यू झाला होता. त्यांना मधुमेह आणि अतिताणाचा त्रास होता. या घटनेनंतर लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञात संस्थेत शुक्रवारी (ता. २६) एका २५ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या भेटा (ता. औसा) येथील होत्या. भिवंडीहून प्रवास करून लातूरात आल्या होत्या. त्यानंतर आता ७० वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा आज (ता. २७) मृत्यू झाला. ते एमआयडीसी भागात राहत होते. या घटनेमुळे लातूरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १० तर उदगीरमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे. या १६ जणांमध्ये १२ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. सध्या व्हेंटिलेटरवर तीन तर ऑक्सिजनवर पाच रुग्ण आहेत. उर्वरित रुग्णांची तब्येत ठीक असून त्यांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत, असेही सांगण्यात आले.

लातूर : कोरोना मिटर

  • एकूण बाधित : ३०७
  • बरे झालेले : १९७
  • उपचार सुरु : ९४
  • मृत्यू : १६
     
loading image