‘त्या’ कोरोनाग्रस्तांसोबत बीडच्याही तिघांचा प्रवास; कुठलेही लक्षण नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

दुबईहून परतलेल्या पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या मुलीला आणि चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याच कोरोनाग्रस्तांसोबत बीडच्याही तिघांनी प्रवास केला आहे. मात्र, त्यांच्यात कुठलेही कोरोनाची लक्षणे आढळले नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

बीड : दुबईहून परतलेल्या पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या मुलीला आणि चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याच कोरोनाग्रस्तांसोबत बीडच्याही तिघांनी प्रवास केला आहे. मात्र, त्यांच्यात कुठलेही कोरोनाची लक्षणे आढळले नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून असून, जर त्यांच्यात अशी काहीही लक्षणे आढळली तर त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जाणार आहे.

दुबईहून परतलेल्या पुण्यातील तिघांना कोरोना व्हायरसची लागण झाली. याच विमानात बीड शहरातील सहयोग नगर भागातील तिघे जण होते. दहा दिवसांपूर्वी हे तिघे परतले आहेत. मात्र, त्यांच्या चाचण्या केल्यानंतर त्यांचत अशी कोणतीही लक्षणे आढळलली नाहीत.

आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून आहे. तशी कुठलीही लक्षणे आढळली तर त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जाणार आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

केंद्र सरकारच्या वतीने डॉक्टरांना कोरोनावर उपचार करण्याचे ट्रेनिंग देण्याचे काम सुरू आहे. हेच डॉक्टर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील डॉक्टरांना कोरोना रुग्णाणवर उपचार करण्याची ट्रेनिंग राज्यात 11, 12 व 13 मार्चला देणार आहेत. तसेच राज्यातील 502 कोरोना संशयितांपैकी 7 रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

श्री. टोपे म्हणाले, की राज्यात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, तसेच राज्यातील तिन्ही आंतराष्ट्रीय विमानतळांवर आतापर्यंत 1 लाख 18 हजार 267 प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 502 प्रवाशांमध्ये याची लक्षणं आढळली. यापैकी 495 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर 7 जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

आवश्यकता पडेल तेव्हा तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत, म्हणून 85 व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर 9 हजार 801 प्रायव्हेट प्रोटेक्शन किट रेडी स्टॉकमध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा रुग्णालयात 525 बेडची कोरोना व्हायरसच्या रुग्णासाठी व्यवस्था ठेवली आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरसची जनजागृती विविध माध्यमातून सुरू आहे. मांसाहार केल्याने करोना होतो, हा अफवेचा विषय आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. खाण्यापिण्याने कोरोना होत नाही. नागरिकांनी स्वच्छता पाळावी, खोकला शिंक आल्यास तोंडाला रुमाल धरावा, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Patient Beed News