esakal | उस्मानाबादकरांनो, तुम्हाला कोरोना नाही; पण बाहेरुन आलेल्या झुंडीचा भरोसा नाही, घरात बसा

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News Osamanabad`

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा पॉझीटीव्ह रुग्ण आतापर्यंत सापडलेला नसला तरी ज्या जिल्ह्यात पॉझीटिव्ह रुग्ण सापडले आहेत, त्या जिल्ह्यांतून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या जवळपास साडेआठ हजाराच्या जवळपास पोहचली आहे. दोन दिवसातील हा लोकांचा ओढा पाहुन मात्र आरोग्ययंत्रणेवर सुध्दा ताण निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरुन ही माहिती प्राप्त झाली आहे.

उस्मानाबादकरांनो, तुम्हाला कोरोना नाही; पण बाहेरुन आलेल्या झुंडीचा भरोसा नाही, घरात बसा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा पॉझीटीव्ह रुग्ण आतापर्यंत सापडलेला नसला तरी ज्या जिल्ह्यात पॉझीटिव्ह रुग्ण सापडले आहेत, त्या जिल्ह्यांतून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या जवळपास साडेआठ हजाराच्या जवळपास पोहचली आहे. दोन दिवसातील हा लोकांचा ओढा पाहुन मात्र आरोग्ययंत्रणेवर सुध्दा ताण निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरुन ही माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा- खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना होत असुन आता ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज आणखी वाढल्याचे चित्र आहे. अनेक भागामध्ये शटडाऊन केल्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये दिसुन येऊ लागला आहे. परजिल्ह्यात असलेले नागरीक आता आपल्या गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसामध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर निश्चितपणे त्याचा गांभीर्य़ाने विचार करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

तालुकानिहाय आलेल्या लोकांची संख्या पुढीलप्रमाणे
भूम 824, उस्मानाबाद 1629, कळंब 1080, तुळजापुर 796, वाशी 1093, उमरगा 117, परंडा 2523, लोहारा 483

क्लिक करा- बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

चार पैकी दोन निगेटिव्ह

आज जिल्ह्यातील 476 लोकांना क्वारंटाईन जागेत ठेवण्यात आले होते. त्यातील 14 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर अगोदर पाठविलेल्या चार पैकी दोन जणाचे अहवाल प्राप्त झाले असुन त्यामध्ये एकही रुग्ण पॉझीटीव्ह नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागामध्ये आता मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यातुन आपले नागरीक येत आहेत. यांच्याकडे आरोग्य विभागाचे लक्ष असुन त्यानी काळजी घेण्याची गरज आहे. पुढील बारा ते 14 दिवस घरामध्येच थांबुन सहकार्य करण्याची त्यांच्याकडुन अपेक्षा आहे. त्याप्रमाणे त्याना तशा सुचना करण्यात आल्या आहेत.
डॉ. हनुमंत वडगावे - जिल्हा आरोग्याधिकारी जिल्हा परिषद.

हे वाचलंत का?- संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...