तिला होता नवरा, त्यालाही होती बायको... बीड जिल्ह्यात पहाटे उघडकीस आली घटना

रामदास साबळे
Saturday, 25 April 2020

केज तालुक्यातील विडा येथे प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.२५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही विवाहित होते. पण त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पण नेमके कारण समजू शकले नाही. 

बीड : केज तालुक्यातील विडा येथे प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.२५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही विवाहित होते. पण त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पण नेमके कारण समजू शकले नाही. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा येथील बापूराव सिताराम दूनघव (वय ३८) याचे गावातीलच छाया विठ्ठल गायकवाड (वय ३६) या महिलेशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही विवाहित होते. पोलिसांकडून आणि गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २४) रात्री उशिरा बापूराव दूनघव हा घराबाहेर पडला. पण तो उशिरापर्यंत घरी परत आला नाही.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास या प्रेमी युगुलाने विडा शिवारातील सोनार शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून केला. दोन्ही मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. परंतु, या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण काही अद्याप समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Committed Suicide In Kaij Beed Crime News