
खंडापूर (ता. लातूर) येथील ईस्माईल सुभाष दंडगुले याने (ता.२५) जानेवारी २०१८ रोजी आपली अल्पवयीन भाची व तीची बहिण घरात असताना आतमध्ये प्रवेश केला. पिडीत बालिकेच्या लहान बहिणीला फेव्हीकॉल आणण्यासाठी घरा बाहेर पाठवले व त्यानंतर पिडीत बालिकेसोबत अश्लिल चाळे केले होते.
लातूर : अल्पवयीन भाचीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या तीस वर्षीय मामाला येथील विशेष सत्र न्यायाधिश बी. एस. कांबळे यांनी तीन वर्ष कारावास आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
खंडापूर (ता. लातूर) येथील ईस्माईल सुभाष दंडगुले याने (ता.२५) जानेवारी २०१८ रोजी आपली अल्पवयीन भाची व तीची बहिण घरात असताना आतमध्ये प्रवेश केला. पिडीत बालिकेच्या लहान बहिणीला फेव्हीकॉल आणण्यासाठी घरा बाहेर पाठवले व त्यानंतर पिडीत बालिकेसोबत अश्लिल चाळे केले होते. या बालिकेने घडलेला प्रकार घरातील इतर व्यक्तींना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी ईस्माईल दंडगुले याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
या प्रकरणी पोलिसांनी दंडगुले यास अटकही केली होती. काही महिने तो जेलमध्येही राहिल. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच कागदोपत्री पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला. या प्रकरणात पिडीत बालिका, तीची लहान बहिण आणि घटननंतरचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायाधिश बी. एस. कांबळे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये ईस्माईल दंडगुले याला ता.२२ जुलै रोजी तीन वर्ष सश्रम कारावास दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल शिवनारायण रांदड, विशेष सरकारी वकिल मंगेश महिंद्रकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. उमाकांत राऊत, ॲड. अंकिता धूत, ॲड. विद्या वीर यांनी सहकार्य केले. या प्रकरणात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुमित्रा मुंडे, आवेज काझी, पोलिस नाईक श्रीमती पी. आर. सगर, ज्ञानोबा पवार यांचेही त्यांना सहकार्य मिळाले.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
(संपादन-प्रताप अवचार)