esakal | Coronavirus| अंबडमध्ये खाजगी कोविड सेंटर रामभरोसे
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

Coronavirus| अंबडमध्ये खाजगी कोविड सेंटर रामभरोसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-संतोष देशमुख

अंबड (जालना): कोरोना संसर्गाच्या (covid 19 infection) दुसऱ्या लाटेत अंबड (ambad) शहरातील पाच खाजगी कोविड सेंटरला (covid 19 care center) मान्यता देण्यात आली. परंतु, काही खाजगी कोविड रूग्णालयात पात्र डाॅक्टर नसल्याने व्हिजिटर डाॅक्टरांवर कारभार सुरू आहे. मात्र, अशा कोविड रूग्णालयाची तपासणी करण्यासंदर्भात आरोग्य विभाग व महसूल विभागाकडून एकमेंकाकडे बोट दाखवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खाजगी कोविड सेंटर रामभरोसे सुरू आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रत्येक रूग्ण उत्तम उपचार मिळावेत यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. परंतु, अनेक खाजगी कोविड रूग्णालयांमध्ये पात्र डाॅक्टर नताना केवळ व्हिडिटर डाॅक्टरांवर कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अंबड शहरात पाच खाजगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु काही कोविड रूग्णालयात पात्र डॉक्टर नसल्याने व्हिजिटर एम.डी.(मेडीसिन), एम.बी.बी.एस. फिजीशीयन डाॅक्टर नियुक्त करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात दोन हजाराच्या वर नवीन कोरोनाबाधित, ९७ जणांचा मृत्यू

कोविड सेंटरमधील रूग्णांवर उपचार हे फिजीशियनद्वारे झाली पाहीजे. परंतु, हे होते की नाही, याच तपासणी करणे गरजेचे असताना आरोग्य विभाग आणि महसूल विभाग ही तपासणी करण्याचे काम एकमेंवर ढकलून मोकळे होत असल्याचे विदारक चित्र अंबड शहरात पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्यासाठी लागू केले कागदावर नियमांची अंमबजावणी होणे ही अपेक्षित आहे. परंतु, ही अंमलबजावणी कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे पथक कागदावर

शहरातील कोविड सेंटरची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाचे एक पथक स्थापन केले आहे. परंतु, ऑडीट कसे करायचे ? याची माहिती नसल्याने व औषधांची तांत्रिक माहिती नासल्यामुळे तीन महिन्यापासून या पथकाने एकाही रूग्णालयात अद्याप चौकशी केली नाही. दरम्यान पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उपविभागीय कार्यालयाच्या वतीने अंबड शहरातील कोविड सेंटरची तपासणी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे पथक प्रमुख नायब तहसीलदार चिंतामण मिरासे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Buddha Jayanti 2021: पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची रांगोळी

शहरातील खाजगी कोविड रूग्णालयात शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.याशिवाय अनेक रूग्णांकडुन हजारो रूपयांचे औषधी खरेदी केली जाते. परंतु, रूग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलव्दारे पावती देण्यात येत नाही. या प्रकरणाची चौकशीकरून रूग्णांची होणारी लुट थांबवली पाहीजे.

बळीराम खटके,मनसे.

आम्ही चौकशी करून तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. या रूग्णांत बाबत काय निर्णय घेतल्या जातो, हे आम्हाला माहिती नसते. या शिवाय नियमावली सुद्धा आम्हाला माहीत नाही.

-शिरीश वसावे, नायब तहसीलदार, अंबड.

खाजगी कोविड सेंटरसाठी फिजीशियनकडून रुग्णांची तपासणी होणे आवश्यक आहे. कोविड सेंटरची तपासणी करण्याचे काम माझे नसून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे आहे.

- डाॅ. जे. ए. तलवाडकर, अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय अंबड.