उस्मानाबाद जिल्ह्यात ८४ जणांना कोरोनाची लागण, तिघांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Sunday, 11 October 2020

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.११) ८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन जणांचा बळी गेला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.११) ८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तीन जणांचा बळी गेला आहे. दिवसभरामध्ये ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ८३.९१ टक्के असून मृत्युचा दर ३.२२ टक्के इतका आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ११ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या एक हजार ७२१ इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

उस्मानाबादला पावसाने झोडपले, रस्ते झाले जलमय

रविवारी ८४ जणांची यामध्ये भर पडली आहे. १७८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ६१२ जणांची जलद अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ६२ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ७९० तपासण्यांपैकी ८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसुन आले. उस्मानाबाद तालुक्यातील २६ जणांना बाधा झाली आहे. त्यातील २३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर तिघांचे प्रयोगशाळेमधून अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा तालुक्यातील १९ जणांना लागण झाली असुन त्यामध्ये १५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह, तर चार जणाचे प्रयोगशाळेतुन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कळंब येथे १६ जणांना लागण झाल्याची नोंद आहे. यामध्ये ११ जणांचे स्वॅब प्रयोगशाळेतुन पॉझिटिव्ह आल्याचे अहवालात समोर आले आहे. तर पाच जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इतर तालुक्यामध्ये तुळजापुर सहा, लोहारा एक, वाशी आठ, भूम पाच, परंडा तीन अशी रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबाद शहरातील भिमनगर येथील पाच जण, उमरगा येथील अजयनगर सहा, बलसुरचे चार, कळंब येथील यशवंत नगर येथील पाच जण या ठिकाणी एकत्र रुग्ण सापडले आहेत.

ड्युटीवर निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू, अंबड तालुक्यातील घटना. 

तीन जणांचा मृत्यू
उस्मानाबाद शहरातील शांतीनिकेतन येथील ८० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव गावच्या ५५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. उस्मानाबाद शहरातील बौद्ध नगर येथील ६९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. आतापर्यंत ४३१ जणांचा मृत्यु झाला आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १३३७६
बरे झालेले रुग्ण- ११२२४
उपचाराखालील रुग्ण- १७२१
एकुण मृत्यु - ४३१
आजचे बाधित - ८४
आजचे मृत्यु - ०३

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 84 Cases Reported In Osmanabad District