औरंगाबादच्या गुन्हेजगतात काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

औरंगाबादच्या गुन्हेजगतात दररोज अनेक लहानसहान गुन्हेही घडत असतात. पण या घटना लहान वाटत असल्या, तरी ज्यांच्या बाबतीत त्या घडतात, त्या सामान्य नागरिकांसाठी त्या मोठ्याच अडचणीच्या असतात.

पार्किंग ठेकेदाराला धमकावले

औरंगाबाद : पार्किंग ठेकेदाराला शिवीगाळ करून धमकाविल्याच्या तक्रारीनुसार तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात 21 डिसेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आदर्श सुरेश डरांगे यांनी तक्रार दिली. ते बीबी-का-मकबरा येथील पार्किंगचे ठेकेदार आहेत. त्यांना जयराज पांडे, करण पांडे यांनी शिवीगाळ करून पर्यटकांच्या वाहनांना येण्या-जाण्यास अडथळा केला, असे तक्रारीत नमूद आहे. 

नक्षत्रवाडी, संभाजी कॉलनीतून दुचाकी चोरी 

औरंगाबाद : अंकुश दुबळ्या चव्हाण (रा. नक्षत्रवाडी) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना दहा डिसेंबरला चव्हाण यांच्या घरासमोर घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राहुल अशोक खरात (रा. एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना त्यांच्या घरासमोर आठ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. खरात यांच्या तक्रारीनुसार 21 डिसेंबरला सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

मध्यस्थी केल्यावरून एकाला मारहाण 

औरंगाबाद : सलमान आमेर शेख (रा. मुकुंदवाडी) यांना एकाने मारहाण केली. ही घटना 20 डिसेंबरला एवन हॉटेलजवळ मुकुंदवाडीत घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सुनील बबन साळवे (रा. मुकुंदवाडी) असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. सुनीलचे इतर व्यक्तीसोबत भांडण सुरू असताना सलमान शेखकडून मध्यस्थी झाली. याचा राग आल्याने सुनीलकडून मारहाण झाल्याची तक्रार सलमान शेखकडून देण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

मोबाईल, रक्कम लंपास 

औरंगाबाद : फेरोज अहेमदखान इक्‍बाल अहेमदखान (रा. दमडी महाल) यांचा मोबाईल व रोख दोन हजार आठशे रुपये चोराने लंपास केले. ही घटना 20 डिसेंबरला शहाबाजार, निशाण चौक येथे घडली. त्यांच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत चोराने हा ऐवज लंपास केला. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पाठलाग करून महिलेची छेड 

औरंगाबाद : पाठलाग करून महिलेची छेड काढल्याची घटना हिंदुराष्ट्र चौक, गारखेडा येथे शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेखर काळे, अंकुश काळे, नितेश सपकाळ अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी मारहाण करून महिलेला धमकाविले. यानंतर छुपा पाठलाग करून विनयभंग केला व घरावर दगडफेक केली, अशा तक्रारीनुसार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News in Aurangabad District