झाडाला लटकलेला मृतदेह आढळला, आणि बरंच काही...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

औरंगाबाद : हर्सूल, फुलेनगरसमोरील गट क्रमांक 304 येथे पंचावन्नवर्षीय पुरुष शनिवारी (ता. 21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

फुलेनगरसमोरील गट क्रमांक 304 येथे लिंबाच्या झाडाला गळ्यात फास असलेल्या अवस्थेत पुरुष आढळून आल्यानंतर नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळविली. यानंतर हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

औरंगाबाद : हर्सूल, फुलेनगरसमोरील गट क्रमांक 304 येथे पंचावन्नवर्षीय पुरुष शनिवारी (ता. 21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

फुलेनगरसमोरील गट क्रमांक 304 येथे लिंबाच्या झाडाला गळ्यात फास असलेल्या अवस्थेत पुरुष आढळून आल्यानंतर नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळविली. यानंतर हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. काळा रंग, चेहरा गोल, कानाला छिद्रे, पांढरी पॅंट, चॉकलेटी स्वेटर, गुलाबी चौकडी शर्ट, इटकरी रंगाचा बनियन या व्यक्तीच्या अंगात आहे. उंची साडेपाच फूट, ओठावर पांढरा डाग असून या मृताबद्दल माहिती असल्यास 9823222191 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हर्सूल पोलिसांनी केले आहे. 

पाच हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

औरंगाबाद : फुलंब्री येथे कार्यरत तलाठी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. हॉटेल कर आकारणी कमी करण्याच्या बदल्यात त्यांनी हॉटेल व्यावसायिकाकडून लाच घेतली. ही कारवाई रविवारी (ता.22) सिडको भागात करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून प्राप्त माहितीनुसार, दिलीप तुकाराम बावस्कर (वय 53, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, नाथ प्रांगण, गारखेडा) असे संशयित तलाठ्याचे नाव आहे.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

या प्रकरणात तक्रार देणाऱ्याचे फुलंब्री कार्यक्षेत्रात हॉटेल आहे. त्यांना हॉटेलच्या कर आकारणीची नोटीस देण्यात आली होती. हॉटेलची कर आकारणी रक्कम कमी करण्यासाठी तलाठी दिलीप बावस्कर यांनी साडेआठ हजार रुपयांची मागणी केली. यात पाच हजार रुपये लाचपोटी तर साडेतीन हजारांची रक्कम कर आकारणी म्हणून देण्याची त्यांनी मागणी केली. या विरुद्ध हॉटेल व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता बावस्कर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

काही वेळातच हॉटेल व्यावसायिकाकडून पाच हजारांची लाच घेताना बावस्कर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर अधीक्षक अनिता जमादार यांच्या सूचनेनुसार, निरीक्षक गणेश धोक्रट, हवालदार गणेश पंडुरे, पोलिस नाईक सुनील पाटील, दिगंबर पाठक, विजय बाह्मंदे, मिलिंद इप्पर, केदार कंदे व चालक पोलिस शिपाई चांगदेव बागूल यांनी केली. 

गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा 

औरंगाबाद : गॅस सिलिंडरच्या गळतीची तक्रार दिल्यानंतरही सिलिंडर वितरित करताना कर्मचाऱ्याने विशेष काळजी घेतली नाही. परिणामी नारळीबाग येथील घरात गॅसचा भडका होऊन कुटुंबातील तिघे भाजले. ही घटना 19 डिसेंबरला घडली. याप्रकरणी ओंकार गॅसच्या कर्मचाऱ्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात 21 डिसेंबरला गुन्ह्याची नोंद झाली. 

ट्रक लंपास 

औरंगाबाद : सनी सेंटरच्या बाजूला मोकळ्या मैदानातून मुश्‍ताक पठाण (रा. रहेमानिया कॉलनी) यांचा ट्रक चोरांनी लंपास केला. ही घटना 20 नोव्हेंबरला रात्री साडेअकरानंतर घडली. केबिन लॉक करून ते गेल्यानंतर चोरांनी त्यांचा चार लाख रुपये किमतीचा बारा टायरचा ट्रक लंपास केला. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

महिलेची छेड, चौघांवर गुन्हा 

औरंगाबाद : गल्लीतून जाताना येताना छुपा पाठलाग करून महिलेची छेड काढून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात 21 डिसेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सम्राट प्रकाश जाधव, प्रकाश जाधव, राहुल जाधव (रा. पिसादेवी) अशी संशयितांची नावे आहेत. सम्राटने घरात घुसून महिलेची छेड काढून विनयभंग केल्याचेही तक्रारीत महिलेने नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News in Aurangabad District