खुनातील आरोपी जात होता पळून... मग... 

हरी तुगावकर
Tuesday, 28 January 2020

एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका ऑटोरिक्षाचालकाचा एक वर्षापूर्वी खून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरेश छोटानी रावत (रा. बिहार) याला अटक केली होती. त्यावेळेसपासून तो येथील कारागृहात आहे.

लातूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका खुनातील आरोपीने हातकडीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतागृह जवळ असलेल्या भिंतीवरून उडीही मारली. पण तेथेच तो पडल्याने त्याला तातडीने पकडण्यात पुन्हा पोलिसांना यश आले. सध्या त्याच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा आरोपी मुळचा बिहारचा आहे.

येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका ऑटोरिक्षाचालकाचा एक वर्षापूर्वी खून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरेश छोटानी रावत (रा. बिहार) याला अटक केली होती. त्यावेळेसपासून तो येथील कारागृहात आहे. 

हेही वाचा - मनोरुग्णांना इथे मिळणार पूर्ण उपचार  

तो गेल्या काही दिवसापासून तो आजारी असल्याने त्याला सातत्याने येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. उपचार करून पुन्हा कारागृहात नेले जाते. मंगळवारी (ता. २८) दुपारी दीडच्या दरम्यान पोलिस मुख्यालयाच्या पोलिसांनी या आरोपीला उपचारासाठी कारागृहातून हातकडी घालून सर्वोपचार रुग्णालयात आणले होते.

बाह्यरुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेथे तो स्वच्छतागृहाकडे गेला. तेथून त्याने भिंतीवरून उडी मारून जाण्याचा प्रयत्न केला. आजारी असल्याने भिंतीवरून उडी मारल्यानंतर तो तेथेच पडला. त्याला पळता आले नाही. त्यामुळे तातडीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पाठीला मार लागल्याने पुन्हा त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु करण्यात आले आहेत.

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Tried To Escape From Police Custody Hospital Latur News