esakal | अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर उरलसुरल्या तुरीवरही संकट, धुक्याने फुल गळती, अळीचा प्रादुर्भाव.  
sakal

बोलून बातमी शोधा

0000yuvraj dhotre.jpg

परतीच्या पावसामुळे तालूक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातासी आलेले पिके खराब झाली आहेत. आता शेतकऱ्याच्या आशा तुरीवर असताना काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुक पडू लागल्याने तुरीची फुलगळ होत आहे.

अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर उरलसुरल्या तुरीवरही संकट, धुक्याने फुल गळती, अळीचा प्रादुर्भाव.  

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : शहर व परिसरातातील गावामध्ये वातावरणातील बदलामुळे पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडत असून दिवसभरात ढगाळ वातावरण राहात आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व अन्य पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी बाधव संकटात असताना आता तुर पिंकावर फुल गळती व वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भाव होऊ लागली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परतीच्या पावसामुळे तालूक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातासी आलेले पिके खराब झाली आहेत. आता शेतकऱ्याच्या आशा तुरीवर असताना काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुक पडू लागल्याने तुरीची फुलगळ होत आहे. सध्या तूर फुलोऱ्यात असून काही ठिकाणी तुरीच्या पानांवर अळीने हल्ला चढविल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे तुरीची फुले गळाली आहेत. काही माळरान भागातील जमिनीमध्ये पाणी साचले नाही तेथील तूर चांगली, मात्र अळीच्या प्रादुर्भावाने संकट निर्माण झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सद्या रब्बी पेरणीच्या तयारीत शेतकरी असताना तुरीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता नवे संकट उभे राहिले आहे. परिणामी शेतकरी हतबल झाल्याचे व आर्थिक बाजू दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सद्या शेतकरी विविध रासायनिक औषधांची फवारणी करीत आहेत. तर या धुक्यामुळे शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दररोज नवीन संकटे 
एकीकडे अतिवृष्टीचा तडाखा, दुसरीकडे दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल, त्यात धुके आणि शेतकऱ्यांची शेवटची आशा असलेले तुरीचे पीक संकटात असल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रब्बी पिकांच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज नवनवीन संकटांचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे.

(संपादन-प्रताप अवचार)