खुशखबर... अखेर सोयाबीनला विमा मंजूर, ४५८ कोटी नुकसान भरपाई

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : प्रधानमंत्री पिक विमा खरीप 2019 मधील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. उडीद व मूग दोन पिकांचा विमा या अगोदरच मिळायला सुरुवात झाली होती. पण सोयाबीनच्या पिकाची नुकसान भरपाई मिळेल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती.

पण आता जिल्ह्यातील तीन लाख ९२ हजार ६५३ शेतकार्‍यांना ४५८ कोटी ६३ लाख सोयाबीन पीक विमा मंज़ूर करण्यात आला आहे. तर आज खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. इतर पिकांचाही विमा मिळत आहे.

मूग व उडीद या दोन पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17 कोटी 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. पण तेव्हा सोयाबीनच्या पिकाला यापासून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. सोयाबीनचे क्षेत्र अधिक असल्याने त्याची आकडेवारी काढण्यासाठी काहीसा वेळ लागणार होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिक्षा कऱण्याचे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते.

उस्मानाबाद तालुक़ा - ११६ कोटी
कळंब तालुक़ा - ९६ कोटी (शिराढोण - २५ कोटी)
तुळजापूर तालुका - ७२.८५ कोटी
उमरगा तालुका - ४१.४९ कोटी
वाशी तालुका - ३० कोटी
लोहारा तालुका - ३५.५ कोटी
परंडा तालुका - २४.९ कोटी
भूम तालुका - २४.८५ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com