दमदार श्रावणसरीनंतर पिके समाधानकारक 

घनसावंगी : पावसामुळे तगलेले कपाशीचे पीक. 
घनसावंगी : पावसामुळे तगलेले कपाशीचे पीक. 

घनसावंगी (जि.जालना) -  पावसांमुळे चांगल्या प्रमाणात आलेली खरिपांची पिकांना नवजीवन प्राप्त झाली असून ही पिके चांगलीच जोमात आली आहे. तालुक्‍यातील काही भागात जोरदार व चांगला पाऊस झालातर अजूनही काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र या पावसामुळे खरिपांची पिके तग धरून असल्याचे चित्र आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात आजपर्यंत मध्यम ,जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांच्या कालावधी संपला असून तालुक्‍यातील राणीउंचेगाव ते शिंदेवडगाव, पानेवाडी, गुरूपिंपरी, सरफगव्हाण व रांजणी व दुधना नदी काठच्या गावांत तसेच भायगव्हाण, तीर्थपुरी, गोदावरी नदी काठ व परिसरातील गावात आतापर्यत चांगला पाऊस झाला आहे तर घनसावंगी, सिंदेखड, मच्छिंद्रनाथ चिंचोली, ढाकेफळ, कंडारी परतूर, तनवाडी यासह इतर परिसरात अद्याप जोरात पाऊस झाला नाही. परंतू जो पाऊस झाला त्या पावसावर खरिपांची पिके चांगल्या जोमात आहेत. सातत्याने झालेल्या पावसांच्या परिसरात पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सद्याच्या परिस्थितीत मूगाला शेंगा लगडल्या आहे. कापूस, सोयाबीन ही पिके चांगली तरारली आहे. विशेष म्हणजे यंदा सतत पावसाच्या प्रमाणामुळे कापूस व सोयाबीन या पिकांवर कीडी, मावा , तुडतुडे यांच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, मशगती व फवारणीसाठी किटकनाशकांचा यंदा जास्तीचा खर्च सहन करावा लागला नाही.

दरम्यान, पोळा सणाचे आगमन काही दिवसांवर येऊन टेपले आहे. पोळा सणानंतर पाऊस भोळा होतो असे जुने जाणते शेतकरी सांगतात, असे असले तरी यंदा हवामान खात्याने जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसे झाल्यास पिकांच्या उत्पन्नांबरोबर सिंचन प्रकल्पातील चांगला पाणीसाठा वाढेल. यंदा पावसामुळे खरिपांची पिके नव्या जोमाने डौलत आहे त्यामुळे त्यांच्यातून चांगले उत्पन्न हाती येण्याची चिन्हे दिसत आहे. त्याचबरोबर सध्या नदी, नाले पावसामुळे ओसांडून वाहत आहेत. सर्वत्र हिरवळ दिसत आहे. शेतीविषयी व पावसाविषयी शेतकऱ्यांत समाधानांचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पेरणीनंतर पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात राहिल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उगवणक्षमता व उत्पन्नवाढीवर होणार आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या हाती या पावसामुळे या पिकांतून किमान चांगले उत्पन्न हाती येणार आहे. त्याचबरोबर सिंचनाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच आगामी हिवाळा व उन्हाळ्यातील पाणीप्रश्‍नांचे संकट दुर होवून आगामी काळातील ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे . 
विष्णू जाधव, 
शेतकरी, पानेवाडी 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com