esakal | अतिवृष्टीने नुकसान; औसा तालूक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आत्महत्या औसा.jpg


कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीने नुकसान झाल्याने उचलले पाऊल
जलील पठाण

अतिवृष्टीने नुकसान; औसा तालूक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर) : कर्जबारी आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सर्व पीक गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील आंदोरा गावात गुरुवारी (ता.२२) रोजी घडली आहे. मधूकर श्रीरंग पवार (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना पत्नी, तीन मुली व एक अविवाहित मुलगा आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

निवळशेतीवर उदरनिर्वाह चालवत असलेल्या मधुकर पवार यांच्यावर सरकारी व खाजगी मिळून दोन लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज खरिप पिकांवर परतफेड करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र १२ ते १५ अक्टोबर आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने खरिपातील सर्वच पिके हातची गेली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, पुढील उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत ते होते. गुरुवारी (ता.२२) रोजी ते सकाळी लवकर नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र कर्जाची धास्ती घेतलेल्या श्री. पवार यांनी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास स्वता:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती महादेव काशीनाथ शेळके यांनी भादा पोलिसांना दिली असता पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा दुजोरा तहसील कार्यालयानेही दिला आहे. गेल्या कांही वर्षापासून शेतकरी आत्महत्येचं शुक्लकाष्ट औसा तालुक्यातून बाजूला होत नसल्याचे दिसत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)