मेडीकल कॉलेजसाठी आता ताकदीनिशी संघर्ष, परभणीकर संघर्ष समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

गणेश पांडे
Sunday, 6 December 2020

येथील महात्मा फुले विद्यालयात परभणीकर संघर्ष समितीची बैठक रविवारी (ता.सहा) झाली.  या बैठकीस समितीचे संयोजक खासदार फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, तहसिन अहेमद खान, डॉ. विवेक नावंदर, सुभाषराव जावळे, विजयराव जामकर, डॉ. राजगोपाल कालानी, के.पी.कनके, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, किर्तीकुमार बुरांडे, सरचिटणीस रामेश्वर शिंदे, अजयराव गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

परभणी-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी आता पूर्ण ताकदीनिशी संघर्षासाठी सर्वांनी तयार रहावे. पक्षभेद बाजूला सारून परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट तयार करावी असा ठराव रविवारी (ता.सहा) परभणीत झालेल्या परभणीकर संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

येथील महात्मा फुले विद्यालयात परभणीकर संघर्ष समितीची बैठक रविवारी (ता.सहा) झाली.  या बैठकीस समितीचे संयोजक खासदार फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, तहसिन अहेमद खान, डॉ. विवेक नावंदर, सुभाषराव जावळे, विजयराव जामकर, डॉ. राजगोपाल कालानी, के.पी.कनके, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, किर्तीकुमार बुरांडे, सरचिटणीस रामेश्वर शिंदे, अजयराव गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा  पालकांनो सावधान : नांदेड शहरातही आता कॉफी सेंटरही डबल डेक्कर, पाल्यावर ठेवा लक्ष  

यावेळी बैठकीस उपस्थितांनी जिल्ह्यातील विकास प्रश्नावर आपली मते मांडली. यात शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाची परभणी जिल्ह्याला कशी गरज आहे याची माहिती सर्वांनी दिली. माजी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी प्रशासकीय पातळीवर कश्या पध्दतीने पावले उचलावी लागतील. याची माहिती देत वैद्यकीय महाविद्यालय मिळत नसल्याने आपल्याला चिड आली पाहिजे असे सांगितले. अॅड. राजकुमार भांबरे यांनी परभणी जिल्ह्यातील शासकीय कार्यालय पळविण्याची स्पर्धा लागली असून त्यावर अंकुश ठेवण्याची गरज प्रतिपादीत केली. डॉ. राजगोपाल कालानी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणे हा परभणीकरांचा हक्क आहे असे सांगून आपण आला लढा तिव्र करावा असे सुचविले. नगरसेवक विजयराव जामकर यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून एकजूट दाखवावी लागणार आहे असे सांगत आपण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जेष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे हे सांगत या महाविद्यालयासाठी कृषी विद्यापीठाची जमीन मिळूच शकत नसल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले.

शरद पवारासंह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तातडीने परवानगी मिळावी यासाठी येत्या आठवडा भरात राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट अधिवेशनापूर्वी घ्यावी असा ठराव  या बैठकीत मंजुर करण्यात आला. यासाठी स्वता खासदार फौजिया खान व अॅड. विजयराव गव्हाणे यांनी पुढाकार घेतला आहे.

येथे क्लिक करास्वतःला वाघिण म्हणवतेस पण... मिक्का सिंगने लगावला कंगनाला टोला -

परभणीकरांवर अन्याय होत आहे. दोन वेळा समिती आली. दोन्ही समितीने सकारात्मक अहवाल दिला आहे. पंरतू दोन्ही वेळा हुलकावणी दिल्या गेली. आता महाविद्यालयासाठी तीव्र भुमिका हवी आहे. जिल्ह्याचा विकास करायाचा असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे हा आमचा आग्रह आहे.

- फौजिया खान, खासदार ,  राज्यसभा

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विकासाचे दालन उघडले जाणार आहे. त्यासाठी सर्वबाजूने ताकद उभी करणे गरजेचे आहे. स्वताचा व जिल्ह्याचा विकास साध्य करायचा असेल तर संघर्षाची तयारी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.

- अॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार, परभणी

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision in the very first meeting of the Parbhanikar Struggle Committee, now struggling with strength for the medical college parbhani news