esakal | पोलिस, प्रेयसी अन् मित्राच्या छळास कंटाळून नायब तहसिलदाराच्या मुलाची आत्महत्या   
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 1.jpg
  • - पोलीस अधिकाऱ्यासह प्रेयसीच्या छळास कंटाळून उचलले पाऊल 
  • - २४ पानी सुसाईड नोट जप्त 
  • - नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

पोलिस, प्रेयसी अन् मित्राच्या छळास कंटाळून नायब तहसिलदाराच्या मुलाची आत्महत्या   

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : निलंबित करण्यात आलेल्या नायब तहसिलदाराच्या २८ वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूर पार्क परिसरात शनिवारी (ता.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे. पैठण येथील पोलिसांसह प्रेयसी आणि मित्राच्या छळास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मयूर पार्कमध्ये राहणारा साहेबराव नामदेव देशटवाड (वय २८) हा शनिवारी रात्री घरात एकटा असताना त्याने किचनरूममध्ये साडीच्या साह्याने गळफास घेतला. रात्री साडेदहाच्या सुमारास घटना उघडकीस आल्याने नातेवाइकांनी हर्सूल पोलिसांच्या मदतीने साहेबराव यास बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ पानी सुसाईड नोट जप्त केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अकस्मात मृत्यूची नोंद 
हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सहायक निरीक्षक कामे यांच्याकडे सोपवला आहे. साहेबराव याचे वडील नामदेव देशटवाड हे नायब तहसीलदार असून त्यांच्या विरोधात बनावट रेशन कार्ड तयार करून विक्री केल्याचा आरोप असल्याने पैठण येथील ठाण्यात दोन नायब तहसिलदारांसह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, यात नामदेव देशटवाड यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चिठ्ठीत प्रेयसी, मित्रांसह पोलिसांचा उल्लेख 
साहेबराव देशटवाड याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने पैठण येथील पोलीस अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात कोणतेही वारंट नसताना घरात घुसून कुटूंबीयांचा छळ केला. तसेच प्रेयसीने मित्रांच्या मदतीने पैशासाठी छळ केला. घरातील मंडळीही मला हिन वागणूक देत होते. यापूर्वीही आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या असा मजकूर असलेली चिठ्ठी जप्त केली असे सहायक निरीक्षक कामे यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नातेवाईकांचा राडा 
मृत साहेबराव देशटवाड यांच्या आत्महत्येप्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करा नसता मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्यात राडा केला. तसेच दिवसभर घाटीत देखील नातेवाइक जमल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image
go to top