सकाळ इम्पॅक्ट : तलावाची उद्ध्वस्त केलेली भिंत रात्रीतून पूर्ववत

Beed News
Beed News

आष्टी (बीड) : इंडियन आईल गॅस कंपनीने पाइपलाइनच्या कामासाठी गांधनवाडी येथील गाव तलावाची उद्ध्वस्त केलेली भिंत बुधवारी (ता. 11) रात्रीतून बुजविण्यास सुरवात केली आहे.

तक्रारदार शेतकऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही शेततलावच अस्तित्त्वात नव्हता, असे सांगा नाही तर मावेजासाठीच्या पंचनाम्यावर तुम्ही सह्या केल्या आहेत, कंपनीची फसवणूक केली म्हणून तुमच्यावरच गुन्हा दाखल करूत, अशा धमक्या देण्यात येत आहेत. याबाबत सकाळने गुरुवारी (ता. 12) सविस्तर वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते.

तालुक्यातील गांधनवाडी शिवारातील गाव तलावाची भिंत उद्ध्वस्त करून इंडियन आईल गॅस कंपनीने पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर सकाळच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट घेत शेतकर्यांची मते जाणून घेतल्यानंतर या प्रकाराची वाच्यता झाली.

नगर येथील कंपनीच्या कार्यालयास या बाबीची माहिती झाल्यानंतर कंपनीच्या अधिकार्यांनी संबंधित कंत्राटदाराला तलावाची उद्ध्वस्त केलेली भिंत तातडीने पुन्हा दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार भिंतीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता. 12) दुपारपर्यंत सुरू होते. 

नुकसान भरपाईसाठी वेळ लागेल

दरम्यान, तलावाची भिंत फोडण्यात आल्याने तसेच खोदण्यात आलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे शेतकऱ्यांचे विहीर, बोअरवेलचे मोठे नुकसान होणार असून शेतातील अंतर्गत पाइपलाइनही अनेक ठिकाणी फोडण्यात आल्या आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी आज अचानक यू टर्न घेतल्याचे दिसून आले.

तुम्ही या ठिकाणी तलाव नव्हता असे सांगा, नाही तर तुम्ही पंचनाम्यावर सह्या केल्यानंतर तुम्हाला कंपनीने मावेजा दिला आहे. तुम्ही कंपनीची फसवणूक करून मावेजा उचलल्याबद्दल तुमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा धमक्या अधिकार्यांकडून देण्यात आल्याचे एका शेतकर्याने नाव न छापण्याच्या अटीवर सकाळशी बोलताना सांगितले.

शेतकरी-अधिकाऱ्यांचीही मिलीभगत

1972 साली पडलेल्या भीषण दुष्काळात गांधनवाडी येथे रोजगार हमी योजनेतून या गावतलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने परिसरातील शेतकर्यांची सिंचनाची मदार या तलावावर अवलंबून आहे.

मात्र, तलाव झाल्यानंतर संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्यांची नावे सातबारावर कमी न होता तशीच पोकळिस्त राहिली. याचा गैरफायदा घेत अधिकार्यांनी शेतकर्यांना पैशाचे आमिष दाखवत मावेजाची रक्कम देऊन तलावाची भिंतच उद्ध्वस्त केली. पाइपलाइनच्या कामात असे अनेक प्रकार तालुक्यातील इतर गावांमध्ये घडल्याचीही चर्चा आहे. 

पाटबंधारेचे कानावर हात

दरम्यान, बुधवारी (ता. 11) गांधनवाडी तलाव आमच्या अखत्यारित असल्याचे म्हणणार्या पाटबंधारे विभागाचे अभियंता देवेन्द्र लोकरे यांनी गुरुवारी (ता. 12) कानावर हात ठेवले. संबंधित तलाव आमच्या अधिनस्त नसल्याने घटनास्थळावर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा तलाव नेमका कोणत्या विभागाकडून करण्यात आला, याचीही शाहनिशा होण्याची गरज आहे. 

गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा

गाव तलावातील जमीनीच्या सातबारावर राहिलेल्या पोकळिस्त नोंदीचा गैरफायदा घेऊन कंपनीतील अधिकारी व कर्मचार्यांना हाताशी धरून पैसे उचलत आहेत. यामध्ये मध्यस्तीसाठी कंत्राटदारांनी काही दलालही नेमले असून त्यांच्यामार्फत हा उद्योग सुरू असून गैरप्रकार करणारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

Destroyed Dam Wall Reconstructed By Indian Oil Corporation Ashti Beed News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com