esakal | धनगर आरक्षणासाठी तुळजापुरात पेटविली ज्योत 
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापूर.jpg

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, यासाठी तुळजाभवानीमातेच्या महाद्वारासमोर मल्हार आर्मीच्या वतीने ज्योत पेटवून सोमवारी (ता. २१) आंदोलनास प्रारंभ केला.

धनगर आरक्षणासाठी तुळजापुरात पेटविली ज्योत 

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (बीड) : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, यासाठी तुळजाभवानीमातेच्या महाद्वारासमोर मल्हार आर्मीच्या वतीने ज्योत पेटवून सोमवारी (ता. २१) आंदोलनास प्रारंभ केला. जोपर्यंत मागणीची पूर्तता होणार नाही तोपर्यंत ज्योत तेवत ठेवली जाणार आहे; तसेच राज्यभर आरक्षणासाठी जनजागृती केली जाणार आहे, असा निर्धार करण्यात आला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


धनगर समाजासाठी २२ योजनांच्या अंमलबजावणीसाठी एक हजार कोटी रुपयांची तातडीने तरतूद करावी. मेंढपाळावरील हल्ले रोखण्यासाठी त्वरित कायदा करावा. मेंढपाळांना संरक्षणासाठी मोफत शस्त्रपरवाने द्यावेत. धनगर समाजातील युवक-युवतींना पोलिस आणि लष्कर भरतीसाठी मोफत प्रशिक्षण द्यावे. यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासंदर्भात सुरेश कांबळे म्हणाले की, मागील ७० वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून मागणी करीत आहे; तथापि तोंडाला पाने पुसली जात आहेत. यावेळी बाळासाहेब बंडगर, गणपत देवकते, काकासाहेब मारकड, समर्थ पैलवान, आण्णा बंडगर, प्रमोद दाणे, वैभव लकडे, प्रशांत गावडे, आदित्य पैलवान, शाहजी हाक्के, चैतन्य बंडगर आदी उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)