उस्मानाबाद : १३३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात, ३ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना अनुदान वाटप.

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

जिल्हाधिकारी दिवेगावकर ः १३३ कोटी ८४ लाख रुपये खात्यावर 

उस्मानाबाद : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे ९२ टक्के वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ४३ हजार २१४ शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा लागली होती. त्यात ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे मदत दिवाळीपूर्वी की नंतर असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित केला जात होता. मात्र, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दीपावली गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तातडीने प्रक्रिया पूर्ण करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी वाटप झाली रक्कम 
उस्मानाबाद तालुक्यातील ७१ हजार ४६० शेतकऱ्यांना २८ कोटी ४३ लाख ५० हजार रुपये, तुळजापूर ६२ हजार ७७ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपये, उमरगा ५० हजार ४९० शेतकऱ्यांना २० कोटी ३४ लाख ६० हजार रुपये, लोहारा २५ हजार ६९२ शेतकऱ्यांना १५ कोटी २३ लाख २२ हजार रुपये, भूम ५१ हजार ५१२ शेतकऱ्यांना १० कोटी ७८ लाख २६ हजार रुपये, परंडा ३६ हजार ४५१ शेतकऱ्यांना १३ कोटी नऊ लाख १४ हजार रुपये, कळंब तालुक्यातील २० हजार ३४० शेतकऱ्यांना पाच कोटी ८१ लाख २० हजार रुपये तर वाशी तालुक्यातील २५ हजार १९२ शेतकऱ्यांना चार कोटी ७८ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली आहे. उर्वरित रक्कमही वर्ग करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाला दिल्या आहेत. जरी सुटी असली तरी रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. दिवाळीपूर्वी हे काम करण्याचे आवाहन झाल्याने समाधान आहे. 
- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution grants to 3 lakh 43 thousand farmers Osmanabad news