esakal | तानाजींशिवाय नाही शेलारमामांना महत्त्व : दिवाकर रावते
sakal

बोलून बातमी शोधा

 Divakar Rawate's statement about BJP-ShivShena Alliance
  • आघाडी कोणतीही असो, शिवसेनेशिवाय सत्ता अशक्‍य
  • मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार
  • सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा करणार कोरा  

तानाजींशिवाय नाही शेलारमामांना महत्त्व : दिवाकर रावते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शिवसेनेचे संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत; मात्र दिवाकर राऊत यांना कोणती संधी असेल? या पत्रकाराच्या प्रश्‍नावर श्री. रावते यांनी "तानाजीं'शिवाय  शेलारमामांना महत्त्व नाही, असे स्पष्ट करीत भावी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे; तसेच शिवसेनेशिवाय सत्ता कुणालाही शक्‍य नाही, असा दावा केला. परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची श्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली. त्यानंतर औरंगाबादेत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पुढे बोलताना श्री. रावते म्हणाले, की आघाडी असो की महाशिवआघाडी अशा कोणत्याही आणि कितीही आघाड्या असो, कोणी कितीही दावे करोत; मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. राज्यातील जनतेने तसा कौल दिल्याचेही सांगत शिवसेना येणाऱ्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड
 
सर्व्हे पूर्ण, मात्र अहवाल अपुरा 
  
विभागीय आयुक्तांकडून आपण माहिती घेतल्याचे सांगत जिल्हाभरात 98 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; मात्र काही लोक बाहेरगावी असल्याने त्यांचे पंचनामे होऊ शकले नाहीत, अशा परिस्थितीत उपलब्ध पंचनामे (सर्व्हे) हे तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठवावेत; तसेच पीकविमा भरलेले आणि न भरलेले अशा दोन टप्प्यात अहवाल पाठवावा असे निर्देश विभागीय
आयुक्तांना दिले असल्याचे रावते यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत अशांचा अहवाल पुन्हा स्वतंत्र पाठविण्यात येणार आहे. 
 
दानवे देतील बॅंकांना भेटी 
2016 या वर्षापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली खरी; मात्र अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले असून, आपण याचा अहवाल घेतल्याचेही श्री. रावते म्हणाले. उर्वरित कर्जमाफीसाठी शिवसेनेचे अंबादास दानवे हे प्रत्येक बॅंका बॅंकात जाऊन याचा तपास घेऊन अशी प्रकरणे निपटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
बॅंकांनी शेतकऱ्यांच्या मागे कर्ज परतफेडीची भुणभुण लावू नये, असे संबंधितांना तोंडी आदेश दिल्याचे रावते यांनी सांगितले. 
 
नुकसानीपेक्षा पावसाने समाधान 
श्री. रावते यांनी गंगापूर तालुक्‍यात पाहणी केली असता, बॅकवाटरचे पाणी शेतात घुसल्याने मका, कपाशी, ऊस पिकांत आजही पाणी असल्याचे सांगितले. मात्र, सोबतच नुकसानीपेक्षा मराठवाडा जलमय झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत, हेही सांगायला रावते विसरले नाही. 

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..