esakal | महावितरणचा निर्लज्ज कारभार : रोहित्राच्या वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी 
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण-नोकरीची-संधी.jpg

दुरुस्तीऐवजी जळालेलेच रोहित्र महावितरणकडून पुन्हा माथी. 

महावितरणचा निर्लज्ज कारभार : रोहित्राच्या वाहतुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : आकडे टाकून विजेची चोरी नवी नाही. पण, जे ग्राहक नियमित देयके भरतात त्यांचा मन:स्ताप कमी नाही. रीडिंग घेणाऱ्या एजन्सी फक्त महावितरणची तिजोरी रिकाम्या करण्यासाठी असून अंदाजे वीज देयकांमुळे ग्राहक हैराण आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात जळालेले वीज रोहित्र काढण्यापासून दुरुस्तीस्थळी पोचविणे आणि आणण्याचा भुर्दंड ग्राहक आणि शेतकऱ्यांच्याच माथी आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

असे वास्तव असताना महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणची असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. रोहित्रांची वाहतूक तर ग्राहक शेतकरी करतच आहेत. शिवाय दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीसोबत महावितरण अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने दुरुस्त करून देण्याऐवजी पुन्हा जळालेले रोहित्र हवाली करण्याचे प्रकारही सर्रास सुरू झाले आहेत. महावितरणनेच याचे लेखापरीक्षण केले तर सर्व प्रकार समोर येईल. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरी व ग्रामीण भागात अलीकडच्या काळात वीज मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीचे लोक येणे म्हणजे दारात देव येण्याप्रमाणे झाले आहे. अंदाजे अव्वाच्यासव्वा बिले माथी मारण्याने ग्राहकांना शॉक बसत आहे. हा प्रकार कमी की काय, ग्रामीण भागात रोहित्र जळाल्यानंतर ते उतरविण्यासह तालुका किंवा विभागाला पोच करण्यासाठीचा सर्व खर्च त्या-त्या भागातील ग्राहक वर्गणीच्या माध्यमातून करतात. शेतांमध्येही असाचा प्रकार आहे. दुरुस्त झालेले रोहित्र आणण्यासाठीही वाहन भाडे ग्राहकांच्याच माथी आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण आणले नाही तर भेटत नाही. मागणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे खिशाला चार पैसे झळ बसली तरी हरकत नाही म्हणून हा खटाटोप ग्राहकांनाच करावा लागतो. जिल्ह्यात हा प्रकार आता नित्याचा झाला आहे. त्यात दहा पाच रोहित्रांच्या दुरुस्तीमागे एखादं दुसरे आहे तसेच हवाली करण्याचे प्रकारही वाढले आहेत. अधिकाऱ्यांची दुरुस्ती एजन्सीसोबत मिलीभगत असल्याने हा प्रकार सुरू आहे. एकूणच महावितरणच्या तिजोरीवरही डल्ला आणि ग्राहकांचे खिशे मोकळे होत असताना महावितरण नुसते पत्रक काढून सल्ले देण्यात धन्यता मानत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)