जालना शहर हे मोठी व्यापारी पेठ आहे. या शहरात स्टील कंपनी, वेगवेगळ्या सीड्स कंपनीच्या माध्यमातून दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. या व्यापाऱ्यांना तसेच सीड्स कंपन्यांना उत्पादन केलेला माल इतर बाजारपेठेत नेण्यासाठी ड्रायपोर्ट प्रकल्पाची उभारणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकर घेत सतत पाठपुरावा केला आहे.
जालना : जालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टसाठी भूसंपादन पूर्ण झाले. त्यामुळे उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान या ड्रायपोर्टासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जालना शहर हे मोठी व्यापारी पेठ आहे. या शहरात स्टील कंपनी, वेगवेगळ्या सीड्स कंपनीच्या माध्यमातून दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. या व्यापाऱ्यांना तसेच सीड्स कंपन्यांना उत्पादन केलेला माल इतर बाजारपेठेत नेण्यासाठी ड्रायपोर्ट प्रकल्पाची उभारणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकर घेत सतत पाठपुरावा केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या प्रकल्पासाठी दरेगाव परिसरात भूसंपादन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगती पथावर आहे. ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या उभारणीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे. व्यापारी, शेतकऱ्यांचा माल इतर बाजारपेठत नेणे सोयीस्कर होणार आहे. तर अनेकांना यातून रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जालना जिल्ह्यातीलसह मराठवा़ड्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
निधी कमी पडून देणार नाही
देशातील पहिला ड्रायपोर्ट जालना येथे मंजूर झाला असून त्याचे काम प्रगती पथावर आहे. या कामाचा मी सतत आढवा घेत आहे. केंद्र शासनाकडून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ड्रायपोर्टच्या कामे लकरात लवकर पूर्ण केले जाईल. यासाठी कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री.
(संपादन-प्रताप अवचार)