बीड झेडपीच्या आठ शाळांना येणार 'अच्छे दिन'  

दत्ता देशमुख
Sunday, 1 November 2020

  •  आदर्श शाळांसाठी निवड 
  • सुविधा, गुणवत्ता वाढीचा प्रयोग 
  • तीन तालुके वगळल्याने नाराजी 

बीड : शिक्षकांची मेहनत आणि पालकांसह ग्रामस्थांचा सकारात्मक सहभागातून अनेक जिल्हा परिषद शाळांनी ‘हम भी कम नही’ हे दाखवून दिले आहे. याच धर्तीवर आता शासनानेही प्रत्येक तालुक्यातून एक शाळेची आदर्श शाळेसाठी निवड केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आठ शाळा या उपक्रमासाठी निवडल्या असल्या तरी तीन तालुके वगळल्याने पालक व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, निवडलेल्या शाळांत भौतिक सुविधांसह शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निवडलेल्या आदर्श शाळांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग असतील. गरज पडल्यास आठवीचा वर्गही जोडण्यात येईल. या शाळेत स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, सायन्स लॅब, सुसज्ज ग्रंथालय अशा भौतिक सुविधा दिल्या जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच शैक्षणिक पोषक वातावरण मिळावे, पाठ्य पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, विद्यार्थ्यांना लिहिता वाचता यावे, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना व त्याचे वाचन लेखन आणि गणिती क्रिया अवगत असाव्यात, शाळेच्या ग्रंथालयातील गोष्टींची पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावेत यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रंथालयामध्ये पूरक वाचन साहित्य, गोष्टीची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, उपलब्ध असेल. या आदर्श शाळांमधील प्रगती पाहून इतर शाळांमधील मुले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत येथील, त्यामुळे हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुका निहाय शाळा 

बीड, येल्डा (ता. आंबेजोगाई), पांग्रा (ता. आष्टी), आमला (ता. धारुर), 
आमला (ता. गेवराई), बनकारंजा (ता. केज), पिंपळवंडी (ता. पाटोदा), राक्षसभुवन (ता. शिरुर) 

 
आठ तालुक्यांतील शाळा निवडल्याचा आनंद असला तरी अंबाजोगाई, परळी व वडवणी या तालुक्यांना डावलण्यात आले आहे. या तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळाही निवडावी. 
मनोज जाधव (कार्यकर्ते) 

 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight schools to have good days Beed ZP news