लातूरात भाजप कार्यकर्त्यांकडून वीजबिलाची होळी, ठाकरे सरकारचा निषेध

हरी तुगावकर
Monday, 23 November 2020

कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे नागरिक आर्थिक विंवचनेत असून अनेक संकटे समोर उभी राहीली आहेत.

लातूर : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे नागरिक आर्थिक विंवचनेत असून अनेक संकटे समोर उभी राहीली आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अनेकजण बेरोजगार झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. अशा स्थितीत नागरिकांना मदत करणे आवश्यक होते परंतु सरकारने मदत न करता लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार बंद असतानाही भरमसाठ वीजबिले पाठवली आहेत. घरगुती वापराच्या मीटरची बिले अधिक आलेली असून शेतीपंपाची देखील अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वाढीव वीजबिले भरणे कठीण आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने वीज बिलांची होळी करून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली. या आंदोलनात संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, मंगेश बिराजदार, अजित पाटील कव्हेकर, स्वाती जाधव, रवी सुडे, संजय गिर, ललित तोष्णीवाल, ज्योतीराम चिवडे, मुन्ना हाश्मी, व्यंकट पन्हाळे, महेश कौळखेरे, मीना भोसले, अॅड. अवचारे, ज्योती मार्कंडे, सुनिता उबाळे, आनंदी कदम आदींनी सहभाग नोंदवला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity bill Holi BJP workers movement Latur news