जालन्याची रेड झोनकडे वाटचाल, परिचारिकेसह एसआरपीएफ जवान पॉझिटिव्ह @१३

महेश गायकवाड
Monday, 11 May 2020

जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका परिचारीकेचा समावेश असून दुसरा रूग्ण हा राज्य राखीव दलातील जवान असून तो मालेगाव बंदोबस्‍तावरून जालन्यात परतला होता. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुधकर राठोड यांनी सोमवारी (ता.११) दिली आहे. रविवारी (ता.१०) तीन रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात सोमवारी पुन्हा दोन कोरोना बाधीत रूग्णांची भर पडली आहे.

जालना : जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका परिचारीकेचा समावेश असून दुसरा रूग्ण हा राज्य राखीव दलातील जवान असून तो मालेगाव बंदोबस्‍तावरून जालन्यात परतला होता. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुधकर राठोड यांनी सोमवारी (ता.११) दिली आहे. रविवारी (ता.१०) तीन रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात सोमवारी पुन्हा दोन कोरोना बाधीत रूग्णांची भर पडली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे रूग्ण संख्या एकूण १३ झाली आहे. सोमवारी पॉझीटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकेचा समावेश असून ती जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना वार्डात कार्यरत आहे. राज्य राखीव दलाचा जवान मालेगाव बंदोबस्तावरून शहरात परतला होता. सदर जवानाचे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अलगीकरण करण्यात आले होते. सोमवारी या दोघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. जिल्हा रूग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्हा रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांमध्ये धडकी भरली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

जालन्यात वाढतोय कोरोनाचा प्रादूर्भाव     
आठवडाभरानंतर जालन्यात रविवारी (ता.१०) तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले होते. काल एकूण १२ रुग्ण पॉझिटिव्ह होते. रविवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील दोन रूग्णांचा समावेश होता,तर आज सोमवारी अहवाल आलेल्या रुग्णात जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना वार्डात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा समावेश आहे.

तर दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा राज्य राखीव दलाचा जवान असून तो बंदोबस्तावरुन शहरात परतला होता. जिल्ह्यात १ मे पर्यंत आठ रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन महिला रूग्णांचा उपचारानंतरचा अहवाल कोरोना निगेटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे एका महिलेला सुट्टी देण्यात आली आहे. तर इतर सहा रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Corona Positve Patient Jalna News