पीक विम्याच्या आड लोकप्रतिनिधींचा हट्ट, उत्पादकता कमी, आता मदतीचाी आशा मावळली! 

अतिवृष्टी नुकसान.jpg
अतिवृष्टी नुकसान.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असून त्याची उत्पादकता घटविण्याची मानसिकता काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. काही लोकप्रतिनिधीच्या हट्टापोटी ही उत्पादकता कमी दाखविल्याने त्याचा भविष्यात मोठा फटका बसणार आहे. नुकसान झालेल्या सोयाबीनला यामुळे मदतीचा हात मिळणे अवघड होऊन बसले आहे.

हेक्टरी दहा क्विंटल जिल्ह्याची उत्पादकता असेल तर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कशी मिळेल याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदातरी ही उत्पादकता खरी दाखविण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. असे असले तरी हेक्टरी १६ क्विंटल एवढी उत्पादकता दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.
 

जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढीपेक्षा पीक विमा मिळविण्याचा उद्देश वाढत असल्याचे काही वर्षापासून दिसत आहे. उत्पादन कमी दाखविले की, पीक विमा मिळणार अशी एक शक्यता गृहित धरुन दरवर्षी ही उत्पादकता कमी करण्यात येत असल्याचे विदारक चित्र आहे. पण जेव्हा  अतिवृष्टीने उभ्या पिकाचे नुकसान होते. तेव्हा त्याला शासनाच्या नियमानुसार मदत देता येत नाही. त्याचे प्रमुख कारण जिल्ह्याची उत्पादकता कमी असते. नुकसानीत सुद्धा तेवढे उत्पादन सहजासहजी निघते. हेक्टरी १६ क्विंटल म्हणजे साधारण एकरामध्ये सहा ते सात क्विंटल उत्पादन गृहीत धरण्यात आले आहे. 

गेल्या वर्षापर्यंत हेक्टरी दहा क्विंटल म्हणजे एकरी चार क्विंटल उत्पादन निघत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. याला नेमके जबाबदार कोण याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, त्याला उत्पादनातून पैसा मिळाला पाहिजे हे कोणत्याही धोरणकर्त्याचे लक्ष असायला हवे. काही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रलोभन देऊन उत्पादन कमी दाखविण्याचा सल्ला देतात. जेव्हा खरच शेतकऱ्यांचे नुकसान होते. तेव्हा शासनाकडून मदत मिळविण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारी ही मंडळी दोन्ही बाजूने ढोल वाजविताना दिसतात. पण शेतकऱ्यांना खरी परिस्थिती सांगायची तयारी आता लोकप्रतिनिधीनी दाखविण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्पादन कमी दाखविण्याबाबत एक गैरसमज निर्माण झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता काही बदल होत आहेत. पण एकदमच हे चित्र बदलणार नाही. पण निश्चितपणाने त्याची सूरुवात झाल्याने भविष्यात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. उमेश घाटगे - जिल्हा कृषी अधिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com