मंगलाष्टका झाल्या, सात फेरेही उरकले आणि सासरी जाताना नवऱ्या मुली झाल्या फरार

उमेश वाघमारे
Tuesday, 19 January 2021

तीन जिल्ह्यांतून तीन नवऱ्या मुलींना ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोळीची मुख्य सूत्रधार महिलेला बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. 

जालना : बनावट लग्न लावून अनेकांना पैशांना गंडा घालणाऱ्या टोळीतील पाच संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी (ता.१८) अटक केली आहे. विशेष म्हणजे तीन जिल्ह्यांतून तीन नवऱ्या मुलींना ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोळीची मुख्य सूत्रधार महिलेला बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. दरम्यान न्यायालयाने या पाच संशयितांना ता.२० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा

गुजरात येथील पीयूष शांतीलाल वसंत यांच्या नातेवाईक लग्नासाठी मुलींच्या शोधात होते. त्यात लग्नसाठी तीन मुली आहेत, अशी बतावणी एका एंजटने पीयुष वसंत यांना आपल्या नातेवाईकांसह ता.आठ जानेवारी रोजी जालना येथे बोलून घेतले. त्यानंतर मुली बरी घरातील असून मुलींच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील असे त्या एंजटने पीयूष वसंत यांना सांगितले. त्यानंतर एंजटनसह श्री. वसंत व त्यांचे नातेवाईक हे देऊळगाव राजा येथे नवऱ्या मुली पाहिण्यासाठी गेले.

बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे काम

या ठिकाणी त्यांना तीन मुली दाखविण्यात आल्या व त्या त्यांनी पंसत केल्या. त्यानंतर वकीलामार्फत बॉन्डवर लग्न लावून देण्यात आले. मात्र, नागेवाडी टोलनाका येथे लघुशंकेसाठी श्री. वसंत व त्यांचे नावतेवाईक गाडीच्या खाली उतरले. याच दरम्यान या तिन्ही नवऱ्या मुलीसह इतरांनी गाडीसह पळ काढला. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

या प्रकरणाचा चंदनझिरा पोलिसांकडून तपास सुरू असताना बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळीची मुख्यसुत्रधार ही जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील असून या प्रकरणातील एक नवरी मुलगी ही जालना शहरातील शनिमंदिर परिसरातील आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी रविवारी (ता.१७) शनिमंदिर येथून नवऱ्या मुलीला ताब्यात घेत पोलिस खाक्या दाखविल्यानंतर तिने इतर साथिदारांची माहिती चंदनझिरा पोलिसांना दिली. त्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दुसरी नवरी मुलगी रविवारी ताब्यात घेतली. तर या टोळीची मुख्य सूत्रधार महिला व तिसरी नवरी मुलीला बुलडाणा जिल्ह्यातून सोमवारी (ता.१८) अटक केली.

तसेच राहूल दिलीप म्हस्के (वय २३,रा. नागेवाडी, ता.जि. जालना) याला नागेवाडी टोलनाका येथून चंदनझिरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण पाच मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी वाहन असा एकूण चार लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल चंदनझिरा पोलिसांनी जप्त केला आहे. 

दरम्यान या टोळीकडून अनेकांची फसगत केल्याचा संशयित पोलिसांना आहे. तसेच या टोळीत असून काही संशयित असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान न्यायालयाने पाच संशयितांना ता.२० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलिस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे, महिला कर्मचारी रेखा वाघमारे, शकुंतला वाघ यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Marriage Making Gang Arrested Jalna Latest News