काबाडकष्ट करून कुटुंब जगत होतं; पण अखेर जीव गेलाच..बीडची हेलावणारी घटना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

केज (जि. बीड) - सततच्या नापिकीमुळे कोलमडलेली कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून केज तालुक्‍यातील तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 18) रात्री नऊच्या सुमारास ढाकेफळ येथे घडली. नितीन सुदाम चटप (वय 30) मृताचे नाव आहे.

तालुक्‍यातील ढाकेफळ येथील नितीन चटप या तरुण शेतकऱ्याला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सातवीतच शिक्षण सोडावे लागले होते. यानंतर तो कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेतीच्या कामात आई-वडील व मोठ्या दोन भावांना मदत करत होता.

हेही वाचा -  नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

तिघांच्या लग्नानंतर काबाडकष्ट करून कुटुंब जगत होते; मात्रमागील चार-पाच वर्षांतील सततच्या दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. या दुष्काळी चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांच कंबरडच मोडल होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही रात्रंदिवस कष्ट करून काढलेले उत्पन्न कवडीमोल भावाने बाजारात विकावे लागले.

हेही वाचा - बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

या वर्षीची खरिपाची पिके पावसाअभावी करपून गेली. यामुळे शेतात पेरणीसाठी दुसऱ्याकडून घेतलेले पैसे परत कसे करावेत? त्यातच शेती कोरडवाहू मग जगायचे कसे? या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. त्याच्यावर ढाकेफळ येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतामागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Family's Financial Woes Were Shattered And He Committed Suicide