जामवाडी, वखारी, पोखरी, सिंधी काळेगाव, गोंदेगाव, गोला पांगरी आदी गावातून आलेल्या शेतकऱ्यांना नाहक पालिका कर्मचाऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही सकाळी भाजीपाला घेवून आलो तर आम्हाला बसू दिले नाही. तीन ठिकाणी बसून भाजीपाला विकला. नगर पालिकेच्या साहेबांनी आमचा भाजीपाला उचलून फेकला असल्याचे रामनगर येथील शेतकरी गणेश जाधव यांनी सांगितले.
जालना : जुना जालन्यातील रविवार बाजारात शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तीनदा जागा बदलावी लागली तर काहीचा भाजीपाला फेकल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरातील जुना जालना भागात गांधी चमन ते स्टेशन रोड पर्यंत रविवारी बाजार भरतो. मागील दोन आठवडे फारसा बाजार भरला नाही. रविवारी ( ता.२९) शेतकरी भाजीपाला घेवून आले तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बसण्यास मनाई केली. अनेक गावातून आलेले शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला घेवून नगर पालिकेच्या स्टेडियमवर आले. याठिकाणी काही वेळ बसल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथूनही शेतकऱ्यांना हकलून दिले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जामवाडी, वखारी, पोखरी, सिंधी काळेगाव, गोंदेगाव, गोला पांगरी आदी गावातून आलेल्या शेतकऱ्यांना नाहक पालिका कर्मचाऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही सकाळी भाजीपाला घेवून आलो तर आम्हाला बसू दिले नाही. तीन ठिकाणी बसून भाजीपाला विकला. नगर पालिकेच्या साहेबांनी आमचा भाजीपाला उचलून फेकला असल्याचे रामनगर येथील शेतकरी गणेश जाधव यांनी सांगितले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांना दिवसभर मनस्ताप सहन करीत भाजीपाला विकावा लागला असल्याचे विशाल खैरे यांनी सांगितले. नगर पालिका प्रशासन आणि गुत्तेदार यांच्यातील वादामुळे रविवार बाजार सुरळित भरला नाही. यामुळेच शेतकरी वर्ग हैराण झाला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक शेतकरी दिवसभर हैराण झाल्याने अनेकांनी हरिओमनगरात आपले दुकान मांडत भाजीपाला विकला.
नेहमीसारखेच आम्ही भाजीपाला घेवून आलो पण आम्हाला तीनदा हाकलून दिले. काही लोकांचा भाजीपालाही फेकून दिला होता. -संतोष खैरे, शेतकरी, वखारी
(संपादन-प्रताप अवचार)