
घरगुती वादातून वैजापूर तालुक्यातील घटना.
वैजापूर (औरंगाबाद) : मुलाने गळफास घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांनी विषारी औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील कागोनी शिवारात बुधवारी व गुरुवारी रात्री घडली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोयगाव येथील सुरेश कैलास मोटे (वय २२) व कैलास अप्पासाहेब मोटे (५५) या बाप-लेकाचे घरगुती कारणावरून दोन ते तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. यानंतर मुलगा सुरेश घरातून रागाने निघून गेला. गुरुवारी गट क्र. ४० येथील तलावाजवळ झाडाला गळफास लावून सुरेशने आत्महत्या केल्याचे उघड झाले. मुलाचा गुरुवारी रात्री अंत्यविधी झाल्यावर वडील कैलास मोटे हे घरातून बेपत्ता होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शिवारातील एका विहिरीजवळ त्यांच्या मोटारसायकलजवळ औषधांचा डबा आणि चपला आढळल्या. त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. यावेळी वांजरगाव येथील सुरेश लहिरे, सुभाष लहिरे व कागोनीचे पोलिस पाटील मच्छिंद्र धनाड व ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी उशिरा कैलास मोटे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावरून घरगुती कारणावरून दोघांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समजले. मुलगा व पाठोपाठ वडिलांनीही जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)