वडवणीतील चिमुकलीचा खून केल्याचे निष्पन्न, पित्याला अटक  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

वडवणी येथील हॉटेलचालक व फूल विक्रेते गणेश विठ्ठल शिंदे यांची सहा वर्षांची मुलगी अमृता गणेश शिंदे ही पाच दिवसांपूर्वी चिंचोटी रोडवर असलेल्या स्वतःच्या घरासमोर खेळत असताना सकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाली होती.

वडवणी (जि. बीड) - वडवणी शहरातील बेपत्ता झालेल्या व नंतर नदीपात्रात मृतदेह आढळलेल्या सहावर्षीय चिमुकलीचा खूनच झाला असल्याचे आता उघडकीस आले असून चिमुकलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी अहवालात तिचा गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वडवणी येथील हॉटेलचालक व फूल विक्रेते गणेश विठ्ठल शिंदे यांची सहा वर्षांची मुलगी अमृता गणेश शिंदे ही पाच दिवसांपूर्वी चिंचोटी रोडवर असलेल्या स्वतःच्या घरासमोर खेळत असताना सकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली असता ती न सापडल्याने शिंदे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी फिर्याद नोंदविली. मंगळवारी दुपारी त्या चिमुकलीचा मृतदेह परिसरातील नदीपात्राच्या एका बंधाऱ्यात आढळून आला. या घटनेने वडवणी शहरात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

ती मतिमंद असल्याने व तिला नीट चालत येत नसल्याने तिचे अपहरणच झाल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करीत होते. यामध्ये काही घातपात आहे, असा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला होता. आता त्या उत्तरीय तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये या चिमुकलीचा मृत्यू हा पाय घसरून पाण्यात पडल्याने झाला नसून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

याप्रकरणी मुलीचे वडील गणेश विठ्ठल शिंदे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र मेडिकल रिपोर्टच्या आधारे मृत मुलीचे वडील गणेश शिंदे यांच्यावर संशय असल्याने पोलिसांकडून पित्यालाच अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेशकुमार टाक हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father arrested for murdering daughter in Wadwani

Tags
टॉपिकस
Topic Tags: