लातूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले खत, बियाणे

हरी तुगावकर
रविवार, 28 जून 2020

लातूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱय़ांच्या बांधावर ३१ हजार चारशे मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच सुमारे तीन हजार क्विंटल बियाणे देखील बांधावर देण्यात आले आहे. यातून शेतकऱयांच्या पैशाचीही बचत झाली आहे.

लातूर :  सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱयांचा खत बियाणे वाहतुकीचा खर्च टाळता यावा या करीता कृषी विभागाच्या वतीने बांधावर खत बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आतापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱय़ांच्या बांधावर ३१ हजार चारशे मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच सुमारे तीन हजार क्विंटल बियाणे देखील बांधावर देण्यात आले आहे. यातून शेतकऱयांच्या पैशाचीही बचत झाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

दोन हजार गट कार्यरत

जिल्ह्यात शेतकऱयांच्या बांधावर खत आणि बियाणांचा पुरवण्य़ासाठी शेतकरयाचे गट आवश्यक असतात. जिल्ह्यात असे दोन हजार ४८ गट या खरीप हंगामात कार्यरत झाले. शेतकऱयांची मागणी नोंदवून घेवून या गटांनी त्यांच्या बांधावर जावून खत आणि बियाणांचा पुरवठा केला आहे. सर्वाधिक गट अहमदपूर तालुक्यात २९६, निलंगा २९२, लातूर २७५, उदगीर २६७ तर चाकूर तालुक्यात २४१ गटांचा समावेश आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

चाकूरच्या शेतकऱयांचा पुढाकार

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ४०५ मेट्रीक टन खताचा पुरवठा शेतकऱय़ांच्या बांधावर नेवून देण्यात आला आहे. यात सर्वाधिक खत चाकूर तालुक्यात १७ हजार ८३२ मेट्रीक टन खताचा पुरवठा केला गेला आहे. निलंगा तालुक्यात तीन हजार ४५३, अहमदूपर तालुक्यात दोन हजार ८६७, उदगीरमध्ये एक हजार ४५९, औसा एक हजार २६८ तर लातूर तालुक्यात एक हजार पाच मेट्रीक टन खत देण्यात आले आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

लातूर जिल्ह्यात चालू खऱीप हंगामात शेतकऱयांना बांधावर पुरवठा करण्यात आलेले खत आणि बियाणांची तालुकानिहाय माहिती :  

 • तालुका     शेतकरी      खत (मेट्रीक टनमध्ये) बियाणाचा पुरवठा (क्विंटलमध्ये)
 • लातूर-    २२५६           १००६                        १०८
 • औसा-    १८०६            १२६८                      3०९
 • निलंगा     ४२३५         ३४५३                     ८९२
 • रेणापूर     १३४५          ८९९-                      २२९
 • शिरुर अनंतपाळ ११५२   ९५६                     २०७
 • उदगीर     २१६५           १४५९                    २५४
 • अहमदपूर ४०७४          २८६७                   ४५५
 • चाकूर     ३१०७            १७८३२                  १९३
 • देवणी     ११२२             ७६९                     १०५
 • जळकोट   ३७५            ८९६                     २०८
 • एकूण    २१६३७            ३१४०५                २९६०

 

या योजनेमुळे पहिल्यांदा कोरोनाच्या संकटापासून शेतकरी दूर राहिला. बाजारपेठेत गर्दी झाली नाही. पूर्व नियोजन केल्याने ऐनवेळेस होणारी धावपळही थांबली. इतकेच नव्हे तर खत, बियाणे खरेदीसाठी चर्चेला वेळ मिळाल्याने काही प्रमाणात ते स्वस्तही पडले. यातून शेतकऱयांच्या पैशाची बचत झाली.
 दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer and seed reach 21,000 farmers in Latur district