शेतकऱ्यांना दिलासा : जालना कृषी विभाग देणार घरपोच खते

महेश गायकवाड
Saturday, 9 May 2020

राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढावलेले आहे. अशा परिस्थितीत खरिप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली असून  जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

जालना : राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढावलेले आहे. अशा परिस्थितीत खरिप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहोच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली असून जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी राहिले आहे. शेतकऱ्यांनी शेत मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने कपास बियाणे विक्री तुर्तास बंद केली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्याबरोबर खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गावात खताचा व बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता. आठ) अंबड तालुक्यातील पिंपरखेड येथील मत्स्योदरी ॲग्रो प्रोड्युसर कपंनीमार्फत जवळपास दोनशे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ४८ मेट्रीक टन खतांचा पुरवठा करण्यात आला.

एखाद्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून मागणी केल्यास त्यांनाही खताचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिली असून शेतकऱ्यांनी हव्या असलेल्या खतांची मागणी सबंधीत तालुक्याचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांमार्फत नोंदवावी, असे  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग विविध खतांचा पुरवठा करत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे संबधीत एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन हव्या असलेल्या खतांची मागणी कळविल्यास थेट गावात खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

- भिमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizers To Farmer at Home Jalna News