तुळजाभवानीच्या दर्शन पासवरून भाविकांचा राडा 

जगदीश कुलकर्णी
Sunday, 29 November 2020

केंद्राची केली तोडफोड 

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या दश॔न पास केंद्रावर काही अज्ञात व्यक्तींनी गोंधळ घातल्याचा प्रकार रविवारी (ता. २९) पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडला. नेमका गोंधळ कशासाठी घडला यासंदर्भात वेगवेगळी चर्चा करण्यात येत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनाच्या पाश्वभूमीवर तुळजाभवानी मंदीरातील प्रवेश पास वितरण केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. तुळजाभवानी मंदीर, घाटशीळ रस्त्यावरील धम॔शाळा, एसटी स्टँड तसेच आठवडे बाजारातील केंद्रात पास वितरण केंद्र सुरू आहे. शुक्रवार पेठेतील प्रवेश पास वितरण केंद्रावर रविवारी पहाटे तेथील सुरक्षा कम॔चारी निखील आलटे यांना काही अज्ञातांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. तेथील संगणक आणि अन्य वस्तुंची तोडफोड करण्यात आली. नेमका गोंधळ कशाने झाला यासंदर्भात नक्की माहिती समजू शकली नाही. तथापि केंद्रावरील मिळणारी वागणूक अथवा तेथील काही अन्य गैरप्रकाराने सदरील घटना घडली का अशीही चर्चा दिवसभर सुरू होती. शुक्रवार पेठेत पास वितरण केंद्रावर घडलेल्या घटनेनंतर तेथील संगणकाच्या वायरची दुरूस्ती आणि अन्य कामे चालू होती. रोहीत भीमराव सोनवणे हे सुरक्षा कम॔चारी शुक्रवार पेठेतील पास वितरण केंद्राच्या ठिकाणी दिवसभर कार्यरत होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुळजाभवानी मंदीरात कोरोनाच्या आजारानंतर भाविकांना १६ नोव्हेंबर पासून प्रवेश सुरू झाला. तथापि भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळी केंद्रे कार्यान्वित केली आहेत. भाविकांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागत आहे. कोरोनाच्या आजारानंतर अनेक नवीन समस्या निर्माण होत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

तुळजाभवानी मंदीरातील शुक्रवार पेठेतील पास वितरण केंद्रावर झालेल्या घटनेबाबत पोलीसांना पत्र दिलेले आहे. पोलीस तपास करून कारवाई करतील. 
-सौदागर तांदळे, (तहसीलदार तथा मंदीराचे सरव्यवस्थापक) 

(Edited By Pratap awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting between devotees over TuljaBhavani darshan pass