परळी येथे महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमला आग 

Fire at ATM in Palali dist Beed
Fire at ATM in Palali dist Beed

परळी वैजनाथ (जि. बीड) - शहरातील बाजारपेठेतील परिसरात महाराष्ट्र बॅंकेच्या शेजारील इमारतीमध्ये असलेल्या महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमला शाॅटसर्किट झाल्याने आज (ता. 14) सकाळी सहाच्या सुमारास एटीएम मशीनला आग लागली. त्यात एटीएम मशीन जळून खाक झाले.

येथील बाजारपेठेत महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक शाॅटसर्किट झाल्याने आग लागली. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंब जर वेळेवर उपलब्ध झाला नसता तर परिसरात आग पसरून मोठा अनर्थ घडला असता. नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने वेळोवेळी अग्निसुरक्षा आॅडिट करून घ्यावे असे आवाहन व्यापारी व दुकानदारांना केले. पण, कोणीही याची दखल घेत नाही म्हणून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.
 

तोकडा कायदाही पथ्यावर
अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे हात दुबळे ठरत आहेत. कायद्यात दंडात्मक कारवाईची तरतूद नसल्यामुळे पालिकेला केवळ विद्युतपुरवठा खंडित करणे वा पाणीपुरवठा बंद करणे याच कारवाईवर समाधान मानावे लागते. पण, शहरात अशी कारवाईही पालिकेकडून होत नाही. त्यामुळे ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. 
 

अत्याचार प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक 
 बीड - बीड तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा उचलत अत्याचार करून फरारी असलेल्या आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात आई-वडील ऊसतोडीसाठी परराज्यात गेलेले असल्याने पीडित अल्पवयीन मुलगी लहान बहीण-भावासोबत गावात राहत होती. ती आठ तारखेला सकाळी कापूस वेचण्यासाठी जाताना कोणीही नसल्याची संधी साधून ज्ञानेश्‍वर मोमीन याने सदरील मुलीवर अत्याचार केला. यानंतर मुलीस पोटात दुखू लागल्याने एका मित्राच्या साह्याने अगोदर वडवणी येथे उपचारासाठी नेले; मात्र त्या डॉक्‍टरने उपचार करण्यास नकार दिल्यानंतर बीड येथे उपचार केले.

यानंतर हा प्रकार मुलीने भावाला सांगितला. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर आरोपी फरारी झाले. पाच दिवसांनंतर शुक्रवारी (ता. 13) पिंपळनेर पोलिसांनी मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर मोमीन यास माजलगाव येथून, तर त्याचा साथीदार शंकर मोरे यास वडवणीजवळून अटक केली आहे. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com