
कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलिस व पन्नास वर्षांपुढील ज्यांना विविध आजार आहे अशा रुग्णांना देण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मंगळवारी (ता.एक) जालना येथे दिली. पदवीधर निवडणुकीसाठी मतदान हक्क बजावल्यानंतर श्री. टोपे हे पत्रकारांशी बोलत होते.
जालना : कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलिस व पन्नास वर्षांपुढील ज्यांना विविध आजार आहे अशा रुग्णांना देण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मंगळवारी (ता.एक) जालना येथे दिली. पदवीधर निवडणुकीसाठी मतदान हक्क बजावल्यानंतर श्री. टोपे हे पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, कोरोनावरील लस लवकर यावी यासाठी देशातील पाच कंपन्यांकडून काम सुरू आहे. लस आल्यानंतर ती देण्यासाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना येत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलिस, 50 वर्षांपुढील कोमॉर्बिड रूग्ण व त्यानंतर जेष्ठ नागरिकांना क्रमवारीने माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. या क्रमवारीनुसार कोरोनाची लस देण्याची केंद्र शासनाची मनिषा दिसून येत असून त्यांच्या निर्देशानुसार कोरोना लसीकरणाची कारवाई केली जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोनाच्या लसीकरणावर केंद्र व राज्य शासनाचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हणाले तरी प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्प्यानुसारच कोरोनाची लस दिली जाईल. मात्र, कोरोनाची लस नेमकी कधी येईल याची आज तारीख सांगता येणार नाही. मात्र, कोरोनाची लस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करता येईल याची माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)