लातुरात प्रथमच सीटर-कम-स्लीपर बस दाखल

seater cum sleeper bus
seater cum sleeper bus

लातूर: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सीटर-कम-स्लीपर एसटी बस लातुरात प्रथमच दाखल झाल्या आहेत. त्या औरंगाबाद आणि नागपूर या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता आरामदायी पद्धतीने प्रवास करण्याची सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. 

महामंडळाच्या ताफ्यात 200 नव्या बस दाखल झाल्या आहेत. त्यापैकी चार बस लातूरमधील महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. याचे उद्‌घाटन प्रवाशांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, यंत्र अभियंता कालीदास लांडगे, आगारप्रमुख शंकर सोनवणे, विभागीय भांडार अधिकारी करुणा वानखेडे उपस्थित होत्या. 

माईल्ड स्टील बांधणीच्या बस

देशमुख यांनी सांगितले की, माईल्ड स्टील बांधणीच्या या बस आरामदायी आहेत. एकावेळी 45 जणांना यातून प्रवास करता येईल. यापैकी 30 जणांना बसून तर 15 जणांना झोपून जाता येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येकाला पंख्याची सुविधा देण्यात आली आहे. बसमध्ये एलईडी डिस्प्ले, चालकासाठी ध्वनिक्षेपक, अग्निशमन यंत्रणा, बस थांबवण्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर प्रवाशांसाठी बेल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. लातूर-नागपूर ही बस दररोज रात्री नऊ वाजता लातूरमधून निघणार आहे. यासाठी 880 रुपये तिकीटदर ठेवण्यात आला आहे. तर औसा-लातूर-औरंगाबाद ही बस दररोज रात्री साडेआठ वाजता धावणार आहे. यासाठी 505 रुपये तिकीटदर ठेवण्यात आला आहे. 
हेल्दी राहण्यासाठी या टिप्स करा फॉलो

प्रवाशांना मिळाला मान 
महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नव्या बसचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात येणार होते; पण त्यांनी बसस्थानकावर उभ्या असलेल्या 72 वर्षांच्या रामराव बंडापल्ले आणि छबूबाई फड या प्रवाशांना हा मान दिला. बंडापल्ले यांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली, तर फड यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. त्यानंतर जी. श्रीकांत यांनी बसची पाहणी करून स्टेअरिंग हातात घेतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com