लायन्सच्या डब्यासाठी पाच हजार हात आले धावून, कसे ते वाचा

शिवचरण वावळे
Friday, 3 April 2020

लायन्स क्लबच्या सदस्यांनी समाजातील दानशुर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आज शंभर दोनशे नव्हे तर चक्क पाच हजार जेवणाच्या डब्यांची नोंद लायन्सकडे झाली आहे. ही लायन्स क्लबसाठीच नव्हे तर नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
 

नांदेड : लायन्सच्या वतीने मागील काही महिण्यापासून रयत व श्री गुरुजी रुग्णालयात रुग्णांसोबतच्या नातेवाईकांनाही जेवणाचा डबा दिला जात होता. त्यांचे हे कार्य बघुन शहरातील अनेक दानशुर ‘लायन्सच्या डबा’ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. परंतु, हा डबा आता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनामुळे देश १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तेव्हा अनेकजन रस्त्यामध्ये अडकले आहेत. वाहतुक व्यवस्था ठप्प आहे. खानावळी बंद आहेत. त्यामुळे खिशात पैसे असुन देखील वेळेवर जेवण मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 हेही वाचा-  Video : पोलिस विभागाने केले सफाई कामगारांचे कौतुक

दानशुरना पुढे येण्याचे आवाहन
केंद्र व राज्य सरकारने देशातील कुणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वंयसेवी संस्था, व्यापारी, विविध संघांना पुढे येण्यासाठी आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून लायन्सचा डबा धावून आला. अतापर्यंत त्यांनी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार व शहरात अडकुन पडलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरविले जात आहे. परंतु, पुरविण्यात येत असलेले जेवणाचे डबे खुपच कमी आहेत. अजुन कित्त्येक जणांना जेवणाची गरज आहे. म्हणून लायन्स क्लबच्या सदस्यांनी समाजातील दानशुर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आज शंभर दोनशे नव्हे तर चक्क पाच हजार जेवणाच्या डब्यांची नोंद लायन्सकडे झाली आहे. ही लायन्स क्लबसाठीच नव्हे तर नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

हेही वाचले पाहिजे- Video : सोशल डिस्टन्स पाळत ग्राहक बँकांच्या आवारात

पाच हजार डब्यांची नोंदणी
लायन्स क्लबच्या जेवणाच्या डब्यास हजारो जणांनी सहकार्य केल्याने लायन्स क्लब नांदेड लॉकडाऊन संपेपर्यंत सर्वांना दोन वेळच्या जेवणाचे डब्बे पुरविणार असल्याचे लायन्सचे अध्यक्ष डॉ. विजय भारतीया व दिलीप ठाकूर यांनी शुक्रवारी (ता. तीन एप्रिल २०२०) माहिती दिली. आठव्या दिवशीच्या डबे वितरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व नगरसेवक मिलिंद देशमुख यांच्या हस्ते झाली. शुक्रवारी ३५० डबे देण्यात आले. ॲड. ठाकूर, संजय अग्रवाल, अनिल शर्मा, मन्मथ सगरोळीकर, विक्की स्वामी, राजेशसिंह ठाकूर यांनी घरोघरी जावून डबे वितरीत केले. आतापर्यंत पाच हजार २०० डब्यांची नोंदणी झाली असून दोन हजार ३०० डबे वितरीत करण्यात आले.

 

लॉकडाऊन संपेपर्यंत विद्यार्थ्यांना घरपोच दोन वेळचे जेवण
लायन्सच्या डब्याचे दररोजचे अपडेट सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे पुणे, मुबंई, हैद्राबादसह अनेक ठिकाणचे देणगीदार सढळ हाताने मदत करत आहेत. देशातील लॉकडाऊन संपेपर्यंत दोन वेळचे जेवण विद्यार्थ्यांना घरपोच पुरविले जाणार आहे.
- संजय अग्रवाल उपाध्यक्ष, लायन्स क्लब

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand hands came up for the Lions wreck, read how