लेकराप्रमाणे जपून शेतकऱ्यांने साधली फुलशेतीतून समृद्धी!   

अविनाश काळे
Sunday, 8 November 2020

कोरेगावच्या अय्युब शेख या शेतकऱ्यांने मोठ्या मेहनतीने पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत झेंडू व गुलाबाची फुल शेती केली  आहे. शेतकऱ्याची भूमिका बजावत फुलारी म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक समृद्धीचा मार्ग श्री. शेख यांनी निवडला आहे.

उमरगा (उस्मानाबाद) : हिंदु संस्कृतीत दिवाळी सण सर्वांसाठी आनंदाचा व नवपर्वणीचा असतो. देव -देवतांना, घर, दुकानाला फुलांनी सजविण्यासाठी प्रत्येकजण सक्रिय असतो. मात्र यंदा फुल शेती फारशी फुलली नाही. अतिवृष्टीने फुलशेतीला फटका बसला आणि दसऱ्यात झेंडू भाव खाऊन गेला. आता मोजक्या क्षेत्रात असलेल्या फुलशेतीतील झेंडूला दिवाळीच्या सणात चांगले मार्केट मिळेल.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान कोरेगावच्या अय्युब शेख या शेतकऱ्यांने मोठ्या मेहनतीने पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत झेंडू व गुलाबाची फुल शेती केली  आहे. शेतकऱ्याची भूमिका बजावत फुलारी म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक समृद्धीचा मार्ग श्री. शेख यांनी निवडला आहे. 

शेतातून सोनं पिकतं असा शब्दप्रयोग प्रचिलित आहे. पण निसर्गाच्या लहरीपणाने शेती व्यवसाय विचलित होत आहे. २०२० चा खरिप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेला. अतिवृष्टीने कहर केल्याने पिकाबरोबरच शेतीही वाहुन गेली. आता रब्बीच्या पेरणीचे संकट उभे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालूक्यात खरिप, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्याचा भर असतो. तरूण पिढीतील कांही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत शेतीत नव- नविण प्रयोग साध्य करताहेत. मात्र यंदाचा कोरोनामुळे वाढलेले प्रदिर्घ लॉकडाउनचा काळ फुलशेतीला मारक ठरला. अविनाश थिटे यांची गुलाब शेतीतील फुले झाडावरच वाळून गेली. कैलास आष्टे यांचा जरबेरा उकिरड्यावर टाकावा लागला. अशा अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेतीला लॉकडाउनचा फटका बसला. दरम्यान लॉकडाउन नंतर अतिवृष्टीचे ग्रहण फुलशेतीला लागले. दसऱ्याच्या सणात शहरात केवळ चार ते पाच शेतकऱ्यांनी फुले विक्रीला आणली होती. दरम्यान यंदाच्या दिवाळी सणातही फुलांची आवक कमी असेल, त्यामुळे दर तेजीत रहाण्याची शक्यता आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

झेंडू, गुलाबातून मिळतेय आर्थिक समृद्धी!

कोरेगाव शिवारात अय्यूब शेख या शेतकऱ्यांने तलावक्षेत्राच्या जवळ एक एकर क्षेत्रात झेंडू फुलांची शेती केली आहे, मोठ्या मेहनतीने त्याची जपणूक केल्याने गणेश उत्सव व दसऱ्याला अर्धा एकर क्षेत्रातील पाच क्विंटल झेंडूची विक्री करुन ७५ हजार रुपये मिळाले. आता दुसऱ्या पाऊन एकर क्षेत्रातील झेंडू दिवाळी सणासाठी सज्ज आहे. सात ते आठ क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. दरम्यान श्री. शेख यांनी पाऊन एकर क्षेत्रात गुलाब शेती फुलवली आहे. सध्या दररोज पंधरा ते वीस किलो गुलाब विक्रीतुन दिड हजार रुपये मिळताहेत. दिवाळी सणात आणखी दर वाढल्यानंतर अधिक फायदा मिळणार आहे.

"तलावक्षेत्राच्या बाजूला जमिन असल्याने पाण्याची उपलब्धता आहे. फुलशेती करण्याचा निर्णय घेतला, त्यात मेहनत केली, वेळोवेळी देखरेखीकडे लक्ष दिले. दिवाळी सणासाठी झेंडूची फुले तयार झालेली आहेत. गुलाबांची फुलेही तयार आहेत. यंदा मार्केट चांगले मिळेल अशी अपेक्षा आहे. -अय्युब शेख, कोरेगाव
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower farming brought economic prosperity Umarga farmer Sheikh became successful