esakal | पायी जाणाऱ्यांच्या पोटासाठी दोन घास 
sakal

बोलून बातमी शोधा

 चिंचखेड (ता.अंबड) : पायी जाणाऱ्या कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करताना ग्रामस्थ.

गावाकडे जाण्यासाठी ना वाहनाची व्यवस्था आहे, ना जवळ भूक भागविण्यासाठी भाकरीची सोय. परंतु अशा भुकेल्या पोटी पाचोड महामार्गावरून अंबड, जालना शहराकडे पायी जात असलेल्यांना गत पंधरा दिवसांपासून दररोज जेवण, चहा, नाश्‍ता व इतर सुविधा पुरविण्यासाठी चिंचखेड परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

पायी जाणाऱ्यांच्या पोटासाठी दोन घास 

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) - पाचोड-अंबड मार्गावरून पायी जाणाऱ्या मजूर कामगारांच्या पोटासाठी दोन घास मिळावेत म्हणून चिंचखेड येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अनेकांना मोठा आधार झाला आहे. 

जगात कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे सगळेच भयभीत झाले आहेत. याला पायबंद करण्यासाठी शासनाने संचारबंदी व लॅाकडाउन केले आहे. यामुळे मोठमोठ्या महानगरात पोट भरण्यासाठी गेलेल्या अनेक गावे, वाडी, वस्ती, तांड्यावरील मजूर, कामगार रिकाम्या हाताने आता आपआपल्या गावाकडे परतीच्या मार्गाला लागले आहेत.

हेही वाचा : मिळाले तर दोन घास खायचे, चालत राहायचे... 

मात्र कधी भुकेल्या पोटाने रस्ता शोधत घराच्या ओढीने आलेला दिवस काढावा लागत आहे. गावाकडे जाण्यासाठी ना वाहनाची व्यवस्था आहे, ना जवळ भूक भागविण्यासाठी भाकरीची सोय. परंतु अशा भुकेल्या पोटी पाचोड महामार्गावरून अंबड, जालना शहराकडे पायी जात असलेल्यांना गत पंधरा दिवसांपासून दररोज जेवण, चहा, नाश्‍ता व इतर सुविधा पुरविण्यासाठी चिंचखेड परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

यासाठी चंद्रशेखर मोहरीर, अण्णासाहेब पैठणे, बाळासाहेब मगरे, रमेश गोरे आदीं परिश्रम घेत आहेत.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवत हे कार्य सुरू आहे. 

जेवण बनविण्यासाठी महिलांचे सहकार्य 

गावापासून अनेक कामगार उपाशी व भुकेल्यापोटी जात आहेत. त्यांची भूक भागविण्यासाठी गावातील महिला-भगिनींनी भोजन बनवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले. त्यास प्रतिसाद देत महिलांनी जेवण बनविण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे चहा, बिस्कीट, अल्पोपाहारासोबतच भुकेल्यांना भाजी-पोळी, खिचडी मिळू लागली. 
....................