धक्कादायक: जालन्यात पुन्हा पाच जण पॉझिटिव्ह @४१

महेश गायकवाड
Wednesday, 20 May 2020

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पून्हा पाच रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४१ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी सातत्याने पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जालनाकरांची चिंता वाढली आहे.

जालना: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पून्हा पाच रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४१ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी सातत्याने पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जालनाकरांची चिंता वाढली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. यापूर्वी दोन कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल मंगळवारी (ता.१९) रात्री पॉझिटिव्ह आले.

तसेच मुंबईहून अंबड तालुक्यातील शिरनेर येथे परतलेला एक व्यक्तीही पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधूकर राठोड यांनी दिली आहे. पाच नव्या बधितांमुळे जिल्ह्यात एकूण ४१ कोरोना बाधित रुग्ण झाले असून सध्या रुग्णालयात ३४ रुग्णांवर उपचार आहेत . तर त्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादेत आज सकाळी ४० रुग्ण पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (१), न्याय नगर, गल्ली नं. ७ (२), पुंडलिक नगर, गल्ली नं ७ (१) पोलिस कॉलनी (२), लिमयेवाडी, मित्र नगर (१), शरीफ कॉलनी (१), न्याय नगर, गल्ली न.१ (१), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (३), मराठा गल्ली, उस्मानपुरा (२), कैलास नगर, गल्ली नं.२ ( ३) जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.५(२), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (२), इंदिरा नगर (१), खडकेश्वर (१), माणिक नगर (१), जयभीम नगर (४), पुंडलिक नगर (५), जिल्हा सामान्य रुग्णालय (१), संजय नगर (१), सिटी चौक (१), बालाजी नगर (१), आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (२), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १५ महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourty One CoronaVirus Patient Jalna News