लातूर : विद्यार्थ्यांवर कोरोनाचे मोफत उपचार; स्वास्थ कोविड सेंटरचा निर्णय

corona young.jpg
corona young.jpg

लातूर : येथील श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वास्थ कोविड केअर सेंटरच्या वतीने शहरात शिक्षणासाठी येणाऱया व शिक्षण घेत असलेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या रेग्युलर आणि रिपीटर अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी कोरोनावरचे मोफत उपचार केले जाणार आहेत. अशा पद्धतीचा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिले सेंटर आहे, अशी माहिती सेंटरच्या संचालक प्रा. प्रेरणा होनराव यांनी गुरुवारी (ता. १५) येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव उपस्थित होते.

काही दिवसापूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती. शहरात बेड मिळण्य़ासाठी दोन दिवस वाट पहावी लागली. उपचार घेवून मी बरी झाले. त्यानंतर आपल्या संस्थेच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात हे सेंटर येथील नवीन रेणापूर नाका परिसरात सुरु करण्यात आले. या सेंटरमध्ये ६५ बेड आहेत. त्या पैकी १२ बेड हे ऑक्सीजनच्या सुविधासह आहेत. रुग्णावर उपचार करण्य़ासाठी दोन एम.डी. डॉक्टर, तसेच दोन बीएचएमएस डॉक्टर सेवा देत आहेत. बारा परिचारिका आहेत. तसेच नऊ जण इतर कर्मचारी आहेत. या सेंटरमध्ये औषधोपचारासह भोजन, योगा, करमणुकीचे साधनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात नॉनमेडिको संस्थेने अशा प्रकारचे सुरु केलेले हे पहिलेच सेंटर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


कोरोनामुळे शिक्षण थांबले आहे. त्यात लातूर तर या क्षेत्रात आघाडीवर आहे. येथील शिक्षणही थांबले गेले आहे. पालकांच्या मनात मोठी भिती आहे. शिक्षणाला गती मिळावी या करीता सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरात शिक्षणासाठी येणाऱया किंवा शिक्षण घेत असलेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालीच तर त्याच्यावर या सेंटरमध्ये मोफत उपचार करून सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका अशा सर्वच ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शहरात गेल्या १७ वर्षापासून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे. या संस्थेचे श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयत, श्री त्रिपुरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजगुरु प्राथमिक विद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, लातूर रिलायन्स आयआयटी, जीईई ॲण्ड मेडिकल ॲकॅडमी हे युनिट कार्यरत आहेत.  आयआयटी, नीट, एआयपीएमटीची तयारी देखील येथे करून घेतली जाते. गरीबांच्या मुलांना सवलतीच्या दरात शिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत संस्थेने एक हजार ७५२ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे. दरवर्षी २०० अल्पसंख्य़ाक व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे. संस्थेचे तीन विद्यार्थी आयएएस झाले आहेत. शेकडो विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत. कोरोनाच्या संकट काळात आम्ही कोविड केअर सेंटर सुरु केले. कोरोना असे पर्यंत हे सेंटर सुरु राहणार आहे. तोपर्यंत येथील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर कोरोनाचे मोफत उपचार केले जातील, असे प्रा. उमाकांत होनराव यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य उमाकांत बिराजदार उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com