भावी महापौरच म्हणताहेत,  बीसीसी म्हणजे काय रे भाऊ? 

राजेभाऊ मोगल
Thursday, 14 November 2019

औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले. काय आहे नेमकं हे प्रकरण?

औरंगाबाद - महापौर तर व्हायचयं, निवडणुकीची तयारीही जोरात सुरू आहे, आता फक्‍त आरक्षणाचा घोळ लक्षात येईना झालायं, अरं ते बीसीसी म्हणजे काय रं ? असा सवाल बुधवारी (ता.13) आपापल्या खास शैलीत अनेक ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्यामुळे अनेकजण याचा शोध घेण्याचे प्रयत्न करतानाही दिसून आले. काय आहे नेमकं हे प्रकरण?

राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी बुधवारी मुंबईत आरक्षण काढण्यात आले. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधीही संपुष्टात येणार असल्याने नगरविकास विभागाने बुधवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली. त्यात औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी निघाले. सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर नंदकुमार घोडेले विराजमान आहेत. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2020 ला संपणार आहे. त्यासोबतच महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपणार आहे. 

बीसीसी म्हणजे? 
या सोडतीमध्ये काही ठिकाणी बीसीसी सर्वसाधारण तर काही ठिकाणी बीसीसी महिला असे आरक्षण निघाले आहे. बीसीसी सर्वसाधारण म्हणजे बॅकवर्ड क्‍लास ऑफ सिटीजन (नागरिकाचा मागास वर्ग प्रवर्ग). विशेष म्हणजे यामध्ये महिला किंवा पुरुष असे दोघांनाही निवडणुक लढता येते व महापौर होता येते. मात्र, बीसीसी महिला असे जर आरक्षण सुटले असेल तर याठिकाणी मात्र, केवळ महिलाच निवडणुक लढवू शकते. 

औरंगाबादमधील शक्कर बावडीने गाठला नाही कधीच तळ, पाहा VIDEO

औरंगाबाद महापालिकेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण 
औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार आहे. औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. 

लातूरचे महापौरपद बीसीसीसाठी आरक्षित

पाचव्यांदा महिलेला मिळणार मान 
महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चारवेळेस आरक्षित झाले होते. 1995 मध्ये शिवसेनेतर्फे सुनंदा कोल्हे यांची वर्णी लागली. त्यानंतर 2004 मध्ये रुक्‍मिणी शिंदे, 2007 मध्ये भाजपच्या विजया रहाटकर, 2012 मध्ये शिवसेनेच्या कला ओझा यांची महापौर पदावर निवड झाली. आता 2020 मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौरपदी विराजमान होणार असून, पाचव्यांदा हा मान खुल्या प्रवर्गातील महिलेला मिळाला आहे. 

लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..    

असे आहे राज्यातील महापौर आरक्षण सोडत 
मुंबई- ओपन 
पुणे - ओपन 
नागपूर - ओपन 
ठाणे- ओपन 
नाशिक - ओपन 
नवी मुंबई - ओपन महिला 
पिंपरी चिंचवड - ओपन महिला 
औरंगाबाद - ओपन महिला 
कल्याण डोंबिवली - ओपन 
वसई विरार - अनुसूचित जमाती 
मिरा भाईंदर - अनुसुचित जाती 
चंद्रपूर - ओपन महिला 
अमरावती- बीसीसी 
पनवेल- ओपन महिला 
नांदेड- बीसीसी महिला 
अकोला - ओपन महिला 
भिवंडी- खुला महिला 
उल्हासनगर- ओपन 
अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला) 
परभणी- अनुसूचित जाती (महिला) 
लातूर - बीसीसी सर्वसाधारण 
सांगली- ओपन 
सोलापूर - बीसीसी महिला 
कोल्हापूर - बीसीसी महिला 
धुळे - बीसीसी सर्वसाधारण 
मालेगाव - बीसीसी महिला 
जळगाव - खुला महिला 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: future mayor asking what is BCC?