गणपूर्तीअभावि पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द! सदस्यांची ऑफलाईन सभेची मागणी

अविनाश काळे
Friday, 8 January 2021

"ऑनलाईन" ला नगराध्यक्षासह चौघेच जॉईंन ; सदस्यांची ऑफलाईन सभेची मागणी !

उमरगा : अपहार, दर्जाहिन कामे, अनियमितता आदी कारणाने नेहमी चर्चेत असलेल्या उमरगा पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द, तहकुब होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्याला कारणे वेगळी होती मात्र गुरुवारी बोलावलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेला "ऑफलाईन" च्या मागणीची किनार होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा ऑनलाईन सुरु आहेत, मात्र काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन बैठकीतून सविस्तर चर्चा होत नाही शिवाय दीड जीबीचा डाटाही पूरत नाही. परंतु राज्य सरकारचे ऑफलाईन सभा घेण्याचे अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. नगराध्यक्षा तथा पिठासन अधिकारी प्रेमलता टोपगे यांनी शहराच्या विविध विकास कामांच्या चर्चेबाबत व ठराव घेण्यासाठी पालिकेची गुरुवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन सभा बोलावली होती.

पोलिस अधीक्षकांच्या पथकाची पुन्हा औशातील मटक्यावर धाड; मोठे मासे पथकाच्या गळाला

दुपारी बारापर्यंत सौ. टोपगे यांच्यासह काँग्रेसचे जेष्ठ सदस्य अतिक मुन्शी, विक्रम मस्के, ललिता सरपे चौघेच ऑनलाईन बैठकीला जॉईंन झाले. त्यामुळे सौ. टोपगे यांनी ही सभा गणपूर्तीअभावी रद्द केली. दरम्यान या पूर्वी एक ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली आहे. परंतू गुरूवारची सभा होऊ शकली नाही. दरम्यान पालिकेत "ऑनलाईन" पद्धतीने कांही जणांनी अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे, त्यातील दोघांचा अजून पत्ता लागत नाही.

कोरोनामुळे पालिकेची सभाही ऑनलाईन घ्यावी लागत आहे. परंतू ऑनलाईन मध्ये अनावधनाने बोलल्या जाणाऱ्या कांही बाबीचे रेकॉर्ड होते, शिवाय सविस्तर चर्चा होत नाही म्हणून बऱ्याच सदस्यांनी ऑफलाईनच्या सभेची मागणी केल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय पवार यांनी ऑफलाईन सभेसाठी पत्र देऊनही दखल घेतली नसल्याचे मत व्यक्त केले आहे. 

Gram Panchayat Election: तिरंगी लढतीत सत्तेच्या चाव्या कुणाला मिळणार?

 

"शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी ऑनलाईन सर्वसाधारण सभा बोलावली होती. आम्ही काँग्रेसचे चौघेच सभेला जॉईंन झालो. राज्य सरकारच्या निर्देशानुसारच ऑनलाईन सभा घेण्यात येत आहे. सर्व सदस्यांनी सकारात्मक विचाराने निर्णय घेण्यासाठी एकत्र यायला हवे. - प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General Meeting cancelled Members demandind offline meetings