
नेर ( ता. जालना) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी दादाराव काशिनाथ कुरेवाड यांनी प्राथमिक शाळेतील २१६ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वाध्याय पुस्तिका भेट दिल्या आहेत. तेरवीचा खर्चाला फाटा देत मुलांसाठी हा निधी दिल्याने उपक्रमाचा आदर्श उभा राहिला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शाळा बंद आहेत.
जालना : नेर ( ता. जालना) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी दादाराव काशिनाथ कुरेवाड यांनी प्राथमिक शाळेतील २१६ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वाध्याय पुस्तिका भेट दिल्या आहेत. तेरवीचा खर्चाला फाटा देत मुलांसाठी हा निधी दिल्याने उपक्रमाचा आदर्श उभा राहिला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शाळा बंद आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक आपआपल्या पद्धतीने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. यातच नेर (ता.जालना) येथील दादाराव कुरेवाड यांनी त्यांच्या मातोश्री (स्व.) निलाबाई काशिनाथ कुरेवाड यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत संपूर्ण खर्च त्यांनी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वाटप करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. यापुढेही समाजाने असा विनाकारण होणारा खर्च टाळून सामाजिक व शैक्षणिक कार्यात हातभार लावावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. या वेळी नेर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबूराव पवार यांनी कुरेवाड परिवाराने केलेल्या आदर्श कामाबद्दल कौतुक केले. यावेळी नेरचे सरपंच बेबीताई दाऊदखाँ पठाण, शालेय समिती अध्यक्ष निलेश मासटवाड, दादाराव कुरेवाड, दीपक कुकटकर, भास्कर कुलवंत, प्रताप पाईकराव, विलास खरात, मुख्याध्यापक विजय पितळे यांच्यासह सर्व सहशिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय पितळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण नागरे यांनी दादाराव कुरेवाड व उपस्थितांचे आभार मानले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(Edited By Pratap Awachar)