ही केस सकारात्मक : युवतीचे कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान : पहा Video

महेश गायकवाड
रविवार, 22 डिसेंबर 2019

कॅन्सर; तसेच इतर कारणांमुळे केस गळालेल्या लहान मुलांच्या दिसण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मसन्मानाचा नाश होतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्यातला आत्मविश्‍वास परत मिळवून देण्यासाठी "वीग फॉर किड्‌स' ही सेवाभावी संस्था कार्य करते.

जालना - निसर्गोपचाराचे शिक्षण घेणाऱ्या जालना शहरातील दिव्याप्रिया देशमुख या वीसवर्षीय तरुणीने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी आपल्या लांबलचक केसांचे दान केले आहे. 
तरुणींच्या सुंदरतेमध्ये भर घालणारा एक दागिना म्हणून केसांना महत्त्व आहे.

लहानपणापासून या केसांची सर्व मुली काळजी घेत असतात. अशच प्रकारे लहानपणापासून लांबचलक केस वाढवलेल्या दिव्याप्रिया देशमुख या तरुणीने केस कापून कॅन्सरग्रस्त मुलांसाठी दान केले आहेत. तिच्या या निर्णयाला तिच्या पालकांनी व आजीने पाठिंबा दिला. बुलडाणा जिल्ह्यातील संत गाडगेबाबा निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात ती निसर्गोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?

कॅन्सर; तसेच इतर कारणांमुळे केस गळालेल्या लहान मुलांच्या दिसण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मसन्मानाचा नाश होतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्यातला आत्मविश्‍वास परत मिळवून देण्यासाठी "वीग फॉर किड्‌स' ही सेवाभावी संस्था कार्य करते. या संस्थेच्या माध्यमातून केस गळालेल्या लहान मुलांना मदत व्हावी, या हेतून दिव्याप्रियाने आपले केस दान केल्याचे तिने सांगितले. 

माझे केस कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद निर्माण करणार आहेत, याचा अभिमान आहे. समाजातील महिला व युवतींनीही कॅन्सरग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आपल्या केसांचे दान केले पाहिजे, असे मला वाटते. 
- दिव्याप्रिया देशमुख, जालना 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl donated hair to cancer patients in Jalna