चोरांनी हेरले बंद घर, मारला 15 तोळे दागिन्यांवर डल्ला

Gold Theft AT Aurangabad
Gold Theft AT Aurangabad

औरंगाबाद - बंद घर फोडून चोरांनी दहा हजार रुपये रोकड आणि सहा लाखांचे 15 तोळे दागिने लंपास केले. ही घटना एन-एक, सिडको भागात शुक्रवारी (ता. 13) दुपारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घरमालक आणि किरायेदार या दोघांच्याही घरात चोरट्यांनी डल्ला मारला. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद सूरज यांचे एन-एक, सिडकोमध्ये घर आहे. त्यांच्या घरात धीरेंद्र प्रतापसिंह हे किरायाने राहतात. ते वोखार्ट कंपनीत व्यवस्थापक आहेत.

आनंद सूरज हे कामानिमित्त साऊथ आफ्रिका येथे गेलेत; तर धीरेंद्र प्रतापसिंह हेही 8 डिसेंबरला घराला कुलूप लावून कुटुंबियांसह दिल्लीला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरांनी कुलूप तोडून डल्ला मारला. घरात घुसल्यावर चोरट्यांनी सर्व साहित्य अस्थाव्यस्त केले. संपूर्ण घरभर साहित्य फेकून दिले होते. शुक्रवारी साफसफाई करणारी महिला घरी आल्यावर तिला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ही माहिती धीरेंद्र प्रतापसिंह यांना दिली. त्यांनी हा प्रकार एन-तीनमध्ये राहणारा आपला पुतण्या रवी प्रतापसिंह (30) यांना सांगितला.

ते तत्काळ एन-एकमध्ये दाखल झाले. त्यांनी पाहणी केल्यावर ही माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. त्यावर पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे हे घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी रवी प्रतापसिंह यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

कंटेनर-जीपची धडक, महिला जखमी 
औरंगाबाद : कंटेनरची जीपला मागून धडक बसली. यात जीपचे नुकसान होऊन महिला जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (ता. 12) सायंकाळी चारच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील चावडा कॉम्प्लेक्‍ससमोर घडला. 

याबाबत महेश बापू सोनवणे (रा. भडगाव रोड, चाळीसगाव) यांनी तक्रार दिली. ते बीड बायपास रस्त्याने जीपने (एमएच-20, बीएन-4711) जात होते. जीपमध्ये एका महिलेसह चार ते पाच जण होते. मागून भरधाव कंटेनरची (एनएल-02, एन-4518) जीपला धडक बसली. यात अंजनाबाई भवर जखमी झाल्या व जीपचे नुकसान झाले. या अपघातानंतर कंटेनर जागी
सोडून चालक पसार झाला.

याप्र करणी जीपचालक महेश सोनवणे यांच्या तक्रारीनुसार सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार शेषराव चव्हाण करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com